Israel – Lebanon Peace Talk : इस्रायल, लेबनॉनदरम्यान कराराचा आराखडा तयार, शांततेकडे पहिलं पाऊल

Israel - Lebanon Peace Talk : इस्रायल, लेबनॉनदरम्यान कराराचा आराखडा तयार, शांततेकडे पहिलं पाऊल

74
Israel - Lebanon Peace Talk : इस्रायल, लेबनॉनदरम्यान कराराचा आराखडा तयार, शांततेकडे पहिलं पाऊल
Israel - Lebanon Peace Talk : इस्रायल, लेबनॉनदरम्यान कराराचा आराखडा तयार, शांततेकडे पहिलं पाऊल
  • ऋजुता लुकतुके

अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल आणि लेबनॉन(Israel – Lebanon Peace Talk)यांच्यात दीर्घकाळ चालत आलेल्या संघर्षाला पूर्णविराम देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. वॉशिंग्टनमध्ये दोन्ही देशांदरम्यान एका ‘आराखडा करारा’वर स्वाक्षऱ्या झाल्या असून, हा अंतिम शांतता करार नसला तरी भविष्यातील व्यापक तोडग्यासाठीचा आराखडा मानला जात आहे.(Israel – Lebanon Peace Talk)

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी सांगितले की, या कराराचा मुख्य उद्देश लेबनॉनचे सार्वभौमत्व पुन्हा प्रस्थापित करणे, हिजबुल्लाचे निशस्त्रीकरण करणे आणि त्यांची लष्करी यंत्रणा निष्प्रभ करणे हा आहे. तसेच दक्षिण लेबनॉनमधून इस्रायली सैन्याची टप्प्याटप्प्याने माघार घेण्यासाठीही या करारात प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.(Israel – Lebanon Peace Talk)

करारानुसार, त्रिपक्षीय लष्करी समन्वय गट स्थापन केला जाणार आहे. या गटात अमेरिका, इस्रायल आणि लेबनॉनचे प्रतिनिधी सहभागी असतील. दक्षिण लेबनॉनमधील काही भागांमध्ये सुरुवातीला ‘पायलट झोन’ तयार करून तेथील नियंत्रण लेबनीज लष्कराकडे सोपवले जाईल. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन इस्रायली सैन्य माघारीची प्रक्रिया पुढे नेली जाईल.(Israel – Lebanon Peace Talk)

(हेही वाचा – Ind vs Ire, 1st T20 : पराभवाने सुरुवात पण, श्रेयस अय्यरचे हौसले बुलंद )

मात्र हा करार जाहीर होताच हिजबुल्लाने त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. या चर्चेत हिजबुल्लाचा कोणताही सहभाग नव्हता. संघटनेने स्पष्ट केले की, निशस्त्रीकरणाचा प्रयत्न झाला तर त्याला तीव्र विरोध केला जाईल आणि त्यामुळे लेबनॉनमध्ये यादवी संघर्षाची शक्यताही निर्माण होऊ शकते.(Israel – Lebanon Peace Talk)

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही भूमिका स्पष्ट करत सांगितले की, हिजबुल्लाचे पूर्ण निशस्त्रीकरण होईपर्यंत इस्रायली सैन्य दक्षिण लेबनॉनमधील काही सुरक्षा क्षेत्रांमध्ये तैनात राहील. त्यामुळे करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असल्या तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी अनेक अटींवर अवलंबून असेल.(Israel – Lebanon Peace Talk)

विश्लेषकांच्या मते, हा करार अंतिम शांतता करार नसून विश्वास निर्माण करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात आहे. लेबनॉन सरकार, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सहमती झाली असली तरी हिजबुल्लाचा विरोध आणि सीमावर्ती भागातील सुरू असलेला तणाव पाहता कराराची अंमलबजावणी सोपी नसेल.(Israel – Lebanon Peace Talk)

तरीही अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर दोन्ही देश अधिकृत चर्चेच्या टप्प्यावर आल्याने हा करार मध्य पूर्वेतील शांततेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. पुढील काही आठवड्यांत या कराराची अंमलबजावणी कितपत यशस्वी होते आणि हिजबुल्लाची भूमिका काय राहते, यावरच या प्रक्रियेचे भवितव्य अवलंबून असेल.(Israel – Lebanon Peace Talk)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.