Mumbai Rain Update: आठवडाभरात मान्सून महाराष्ट्र व्यापणार, भारतीय हवामान विभागाने दिली ‘ही’ माहिती

159
Mumbai Rain Update: आठवडाभरात मान्सून महाराष्ट्र व्यापणार, भारतीय हवामान विभागाने दिली 'ही' माहिती
Mumbai Rain Update: आठवडाभरात मान्सून महाराष्ट्र व्यापणार, भारतीय हवामान विभागाने दिली 'ही' माहिती

Mumbai Rain Update: अनेक दिवसांची प्रतीक्षा करायला लावणाऱ्या मान्सूनने आता राज्यात अनेक ठिकाणी बरसायला सुरुवात केली आहे. कोकण, मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यात सोमवारी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आठवड्याभरात मान्सून महाराष्ट्र व्यापणार असून त्याच्या उत्तरेकडील वाटचालीला वेग आला आहे.

मान्सूनची वाटचाल वेगाने
२६ जूननंतर मान्सून वेग धरणार असून त्याची उत्तरेकडील वाटचाल जोमाने होण्याची शक्यता आहे. देशात मान्सून आता जोर धरत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून लवकरच दिल्लीसह उत्तर भारतात पोहोचू शकतो. राजधानी दिल्लीत जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. स्कायमेट वेदरच्या अंदाजानुसार २५-२६ जूनच्या सुमारास बंगालच्या उपसागरात एक अनुकूल प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सूनची वाटाल वेगाने होणार असून जूलैच्या पहिल्या आठवड्यात तो दिल्लीत पोहोचू शकतो.

हेही वाचाPakistani ‘Grooming Gangs’: अडीच लाख ब्रिटीश मुलींवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये ८७ टक्के आरोपी पाकिस्तानी मुसलमान !

दिल्लीत मान्सून कधी दाखल होणार ?
हवामान खात्याने सांगितले की, २३ जूनपासून नैऋत्य मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. मान्सून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दिल्लीत पोहोचू शकतो. तथापि, दिल्लीत मान्सून येण्याची सामान्य तारीख २६-२७ जून आहे. म्हणजेच दिल्लीत मान्सून नेहमीपेक्षा सुमारे एक आठवडा उशिरा दाखल होणार आहे.

२५जूनपर्यंत मुसळधार पाऊस
हवामान विभागाने म्हटले आहे की, २३ जून २०२६ च्या सुमारास मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहारचा अधिक भाग आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये पुढे सरकण्याची दाट शक्यता आहे. ईशान्य भारतासाठी २५ जूनपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.