Konkan Food : उन्हाळ्याची चव वर्षभर जपणारा कोकणातील‘रानमेवा’

266
Konkan Food : उन्हाळ्याची चव वर्षभर जपणारा कोकणातील‘रानमेवा’
Konkan Food : उन्हाळ्याची चव वर्षभर जपणारा कोकणातील‘रानमेवा’
  • धनराज साळवी

Konkan Food : सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत आणि अथांग अरबी समुद्राच्या सान्निध्यात वसलेला कोकण हा निसर्ग, संस्कृती आणि चवींचा अनोखा संगम आहे. भगवान परशुरामाच्या या भूमीत नारळी-पोफळीच्या बागा आणि आंबा-फणसाच्या सुगंधाने दरवळणारा कोकण (Konkan) हा निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. या पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी कोकणात उन्हाळा ऋतू हा फळांसाठी आणि खाद्यपदार्थांसाठी सुवर्णकाळ मानला जातो. मात्र ही चव केवळ काही महिन्यांपुरती मर्यादित न राहता आता वर्षभर अनुभवता यावी, यासाठी कोकणात पारंपरिक प्रक्रिया उद्योगांची समृद्ध परंपरा विकसित झाली आहे.

आंबा वडी, आंब्याची पोळी, आमरस, आमसूल, कैरी पन्हे, कैरीचे लोणचे, फणस पोळी, कोकम आगळ, कोकम सरबत, जांभूळ ज्यूस, आवळा कँडी, आवळा ज्यूस, तांदळाचे पापड, कुरडई, फेणी, नाचणीची फेणी अशा असंख्य पदार्थांची निर्मिती कोकणातील गृहउद्योगपासून आता मोठ्या उद्योजकांडे पोहोचली आहे. या उत्पादनांमुळे स्थानिक महिलांना रोजगार मिळतो, तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिक मूल्य प्राप्त होते. (Konkan Food)

पोषक वातावरण आणि साठवणुकीचे पारंपरिक कौशल्य

कोकणातील उष्ण आणि दमट वातावरण, मुबलक सूर्यप्रकाश आणि फळांची उपलब्धता या उद्योगांसाठी पोषक ठरते. उन्हाळ्यातील (Summer) तीव्र उन्हामुळे फळांचे गर, पापड, पोळ्या आणि मसाले सहज सुकवता येतात. विशेषतः आंबा आणि फणसासारखी फळे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने त्यांच्यावर प्रक्रिया करून टिकाऊ पदार्थ तयार करणे आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरते. (Konkan Food)

उन्हाळ्यात ऋतुमानानुसार मिळणारे विविध खाद्यपदार्थ वर्षभर वापरता यावेत यासाठी त्यांच्यावर विविध प्रक्रिया केल्या जातात. यामध्ये सुकवणे, वाळवणे, मीठ किंवा मसाल्यांमध्ये मुरवणे, गर आटवणे, रसाचे संकेंद्रण करणे, तसेच साठवणूक करून पॅकिंग करणे या प्रमुख प्रक्रिया आहेत. उदाहरणार्थ, आंब्याच्या गरापासून आंबा पोळी तयार केली जाते, कैऱ्यांचे लोणचे घातले जाते, कोकमापासून आगळ आणि सरबत बनवले जाते, तर तांदळापासून पापड आणि कुरडई तयार केली जाते. (Konkan Food)

(हेही वाचा – Jamun Honey: बहुगुणी जांभूळ मध ! ‘या’ आरोग्यदायी वैशिष्ट्यांमुळे विशेष गुणकारी; जाणून घ्या…)

तंत्रज्ञानाची जोड आणि नामवंत कोकणी ब्रँडस्

कोकणातील अग्रगण्य ब्रँड्स ‘रुचिरा फूडस्’, ‘कोकण राज’ आणि ‘योजक’ या उद्योजकांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी संवाद साधला. आता पारंपरिक कोकणी चवीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. स्थानिक कच्चा माल, पारंपरिक पाककृती आणि आकर्षक जागतिक पॅकेजिंग यांच्या अनोख्या संगमामुळेच आज कोकणातील अस्सल उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय ठरत आहेत. (Konkan Food)

‘स्वागत पेय’ म्हणून प्रतिष्ठा मिळवून देणारे स्व. नाना भिडे

रत्नागिरी जिल्ह्यात (Ratnagiri district) १९८५ मध्ये योजक हा उद्योगसमुह स्व. नाना भिडे (Nana Bhide) यांनी सुरू केला. हा घरगुती उद्योग समूह कालांतराने मोठ्या व्यवसायात रूपांतरित झाला. संचालिका दया आनंद भिडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली योजक समूहात आज तब्बल १३५ हून अधिक दर्जेदार पदार्थ तयार करत आहेत. विशेष म्हणजे, या व्यवसायात दररोज ३५० हून अधिक हात राबत असून त्यात ८५ टक्के महिला कामगारांचा समावेश आहे. तसेच ३ ते ४ हजार शेतकरी या समूहाशी थेट जोडलेले आहेत. कोकम सरबताला ‘स्वागत पेय’ म्हणून प्रतिष्ठा मिळवून देणारे स्व. नाना भिडे हे या सरबताचे प्रणेते मानले जातात, असे विधान संचालिका दया आनंद भिडे यांनी केले. ‘कोकम सरबत’ हे ‘योजक’चे मुख्य उत्पादक आहे. याशिवाय, हापूस आंब्याचा आटवलेला रस म्हणजेच ‘आंबा मावा’ हा उत्पादन ग्राहकाच्या विशेष पसंतीस आहे. यामध्ये ‘आंबे हळद लोणचे’, करवंद जाम, करवंद सिरप, चवदार ‘पाचक’ (भूक वाढवणारे पदार्थ) आणि तिखट-खमंग ‘कोकणी ठेचा’ ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत. १६ हून अधिक अधिकृत विक्री केंद्रे असलेल्या योजकची ही दर्जेदार उत्पादने आता www.eyojak.com या वेबसाईटवरून देशभरात कोठूनही घरबसल्या मागवता येतात. (Konkan Food)

गुणवत्तेचा ध्यास आणि ‘क्वालिटी’ उत्पादनांची निर्मिती

१९९० पासून ग्राहकांना शुद्ध आणि उत्तम गुणवत्ता देणारे तेज शिरोडकर ग्रुपचे ‘कोकण राजा’ उत्पादकांचे संचालक उदय विठ्ठलप्रभू शिरोडकर सांगतात, ‘आम्ही क्वांटिटी नाही, तर क्वालिटी प्रॉडक्ट्स तयार करतो.’ आंबा, कोकम, जांभूळ, फणस, करवंद अशा हंगामी फळांचा गर काढून वर्षभरासाठी साठवून त्यापासून २८ दर्जेदार बाय-प्रॉडक्ट्स बनवले जातात. यामध्ये विशेष तंबाखू, चुना, कात विरहित ‘मिठा पान’ आणि ‘आंबा पोळी’, ‘फणस पोळी’, ‘जांभूळ पोळीसह’ ‘आवळा कॅन्डी’, ‘जिंजर-कॅडी’ ही ग्राहकांकडून सर्वात जास्त मागणी असणारे पदार्थ आहेत. मुंबईसह बंगलोर, मैसूर, हैदराबाद आणि गुजरातमध्ये प्रसिद्ध असलेली ही शुद्ध कोकणी उत्पादने ‘अपना बाजार’मध्येही सहज उपलब्ध आहेत. (Konkan Food)

हेल्थड्रिंकच्या जोरावर जागतिक बाजारपेठेकडे वाटचाल

‘आम्ही कोल्डड्रिंक्स नाही, हेल्थड्रिंक विकतो’ असं अभिमानाने सांगणारे ‘रुचिरा’ ब्रॅंडचे मालक दिनानाथ गावडे यांनी १९९६ साली ‘रुचिरा’ ब्रँडची सुरूवात केली. कोकमापासून सरबत, आगळ, गोड कोकम, आमसूल, आंब्यापासून पल्प, सरबत, आमरस, आंबा पोळी, आंबा वडी, कैरी पन्ह, जांभूळ आणि करवंदाच सरबत वेगवेगळ्या प्रकारची लोणची अशी ३० हून अधिक उत्पादन रुचिरा फूड निर्माण करत आहे. ‘लिंबू-आलं पाचक सरबत’, ‘काजू बोंडू सरबत’ आणि ‘आंब्याचा रायता’ ही उत्पादने विशेष प्रिय आहेत. यासाठी १८ कामगार अहोरात्र झटत असतात. ‘मधुर’ साम्राज्य उभारणारे ‘रुचिरा फूड’या कंपनीचे मालक दिनानाथ गावडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात (Sindhudurg District) रोजगार निर्मितीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. सध्या स्थानिक बाजारपेठासह मुंबई, पुणे, नाशिक, पंढरपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव, गोवा अशा रुचिराच्या वितरण कक्षा वाढत आहेत. ‘अस्सल चवीच्या जोरावर ‘रुचिरा फूड’ला जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्याचे गावडे यांचे ध्येय असून, त्यांचा आजवरचा यशस्वी प्रवास पाहता हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. (Konkan Food)

बदलत्या कोकणचे प्रगतीपुस्तक

पारंपरिक ज्ञान, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि महिलांच्या कष्टातून उभे राहिलेले हे गृहउद्योग केवळ व्यवसाय नसून कोकणच्या खाद्यसंस्कृतीचे जतन करणारे महत्त्वाचे माध्यम ठरत आहेत. उन्हाळ्याची अस्सल चव वर्षभर जपण्याचे हे कोकणातील कौशल्य खऱ्या अर्थाने कौतुकास्पद असून, एकेकाळी फक्त पावसाळ्याची साठा म्हणून घराघरांत सुरू झालेली ही उन्हाळी उत्पादने ‘बिझनेस मॉडेल’ बनली आहेत. उन्हाळ्याचा हा कोकणी मेवा आधुनिक प्रक्रियेच्या जोरावर जागतिक बाजारपेठ काबीज करत आहे, हेच बदलत्या कोकणचे प्रगतीपुस्तक आहे. (Konkan Food)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.