मराठवाड्यातील परभणी (Parbhani Temple Collapse) जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मानवत जवळील श्रीक्षेत्र यशवाडी येथील ऐतिहासिक हनुमान मंदिर परिसरात घटना घडली. शनिवारचा दिवस असल्याने हनुमान मंदिरात (Hanuman Temple) दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या सभामंडपाचा पिलर आणि छताचा मोठा भाग अचानक खाली कोसळला. या भीषण दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण मराठवाड्यात खळबळ उडाली आहे. (Parbhani Temple Collapse)
(हेही वाचा – Mumbai Local Megablock: मध्य रेल्वे घेणार ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक, मेल-एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम; पाहा वेळापत्रक)
५ ते ७ जणांचा मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या छताच्या भागाखाली अडकल्यामुळे ५ ते ७ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३० ते ४० भाविक अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यातील काहीजण जखमी झाले आहेत. शनिवार असल्याने दर्शनासाठी मोठी गर्दी असते, आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. त्यात ही घटना घडल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहाणी झाली आहे.
(हेही वाचा – Dombivli Station वर थरार! धावती लोकल पकडताना ७० वर्षीय वृद्ध फटीत अडकणार, तेवढ्यात…)
रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल
जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून तातडीच्या वैद्यकीय मदतीचे कार्य सुरू आहे. या दुर्घटनेमुळे यशवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून भाविकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळाकडे आणि रुग्णालयांकडे धाव घेतली आहे.
परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथे हनुमान मंदिराच्या निर्माणकार्य सुरु असलेल्या छताचा भाग कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेतील जखमींवर उपचार केले जात…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 20, 2026
मृतांना ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर
परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथे हनुमान मंदिराच्या निर्माणकार्य सुरु असलेल्या छताचा भाग कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेतील जखमींवर उपचार केले जात आहेत. स्थानिक प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी असून मदत आणि बचावकार्य सुद्धा वेगाने सुरु आहे. असे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर असे ट्वीट केले.
हेही पहा –


