निकालाने सुन्न झालेल्या Omraje Nimbalkar यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

96
धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! खासदार Omraje Nimbalkar यांचं अखेर ठरलं
धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! खासदार Omraje Nimbalkar यांचं अखेर ठरलं
  • प्रतिनिधी

Omraje Nimbalkar                  ​पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात सीबीआय विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेल्या या लढाईत पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने निंबाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या धक्कादायक निकालानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना न्यायव्यवस्थेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Omraje Nimbalkar)

​”न्यायव्यवस्थेचे हे यापेक्षा मोठे दुर्दैव असू शकत नाही,” असे म्हणत ओमराजेंनी आपली तीव्र निराशा व्यक्त केली. कोर्टाने राजकीय वैमनस्य होते, हे मान्य करूनही सर्व आरोपींना निर्दोष सोडले, हे अनाकलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. “हत्या ही एक वस्तुस्थिती आहे आणि राजकीय वैमनस्य होते हेदेखील न्यायालयाने मान्य केले आहे, मग पवनराजेंची हत्या नक्की कोणी केली?” असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Omraje Nimbalkar)

(हेही वाचा – Hardik Pandya इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकणार, विराटचा सहभाग फिटनेस चाचणीवर अवलंबून)

​तपासातील त्रुटींवर बोट ठेवताना ओमराजे म्हणाले की, सुरुवातीला पोलिसांच्या तपासावर दबाव असल्यानेच आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. मात्र, या प्रक्रियेत आणि सीबीआयच्या तपासात खूप वेळ वाया गेला. आता सीबीआयने या निकालाविरोधात वरिष्ठ न्यायालयात तातडीने दाद मागावी, अशी आमची ठाम मागणी आहे. (Omraje Nimbalkar)

​निकालाच्या पार्श्वभूमीवर ओमराजेंच्या राजकीय भवितव्याबाबतही चर्चांना उधाण आले आहे. आपली पुढील राजकीय दिशा काय असेल, यावर बोलताना ते म्हणाले की, “मी सध्या कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही. माझ्या मतदारसंघात जाऊन, मतदारांशी चर्चा केल्यानंतरच मी माझा निर्णय जाहीर करेन.” (Omraje Nimbalkar)

(हेही वाचा – Delhi Airport : दिल्ली विमानतळावर जवळपास ३५ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त)

​दरम्यान, या खटल्याच्या निकालाचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी तातडीने चर्चा केली आहे. या चर्चेनंतर सीबीआयला या निकालाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे, पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात आता कायदेशीर लढाई नव्या वळणावर आली असून, सर्वांचे लक्ष आता उच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे लागले आहे. (Omraje Nimbalkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.