Longest Day: २१ जून रोजी का असतो वर्षातला सर्वात मोठा दिवस? वाचा सविस्तर

Longest Day: २१ जून रोजी का असतो वर्षातला सर्वात मोठा दिवस? वाचा सविस्तर

168
Longest Day
Longest Day

पृथ्वी (Longest Day) ही सूर्याभोवती फिरत असते, त्याच वेळी स्वत:भोवतीही फिरत असते. सूर्याभोवती फिरण्याच्या क्रियेस परिभ्रमण तर स्वत:भोवती फिरण्याच्या क्रियेस परिवलन म्हणतात. मात्र, पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असल्याने दिवस व रात्र यातील काळामध्ये अंतर असते आणि ते सतत बदलत राहते. या परिक्रमेत २१ जून रोजी १३ तास १३ मिनीटांचा दिवस राहील. यामुळे २१ जून रोजी वर्षातला सर्वात मोठा दिवस राहील. या दिवसात दरवर्षाला एक दिवसाचा फरक पडू शकतो. (Longest Day)

हेही वाचा-“मेलोनी यांनी फोटो काढण्यासाठी भीक मागितली”; Donald Trump यांच्या विधानावर इटलीच्या पंतप्रधानांचे जळजळीत प्रत्युत्तर

पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला आहे. या दिवशी पृथ्वीचा उत्तर धृव सर्वात जास्त सूर्याकडे झूकलेला असतो. त्यामुळे सूर्य जास्तीत जास्त उत्तरेकडे दिसतो. या बिंदूला समर सोल्स्टाईस असे म्हणतात. या बिंदूवर सूर्य असतांना दिवस हा सर्वात मोठा असतो व रात्र ही लहान असते. दिवस व रात्रीचा कालावधी कमीजास्त होणे आपण नेहमीच अनुभवत असतो. २१ जूनपासून उत्तरायन संपून दक्षिणायन सुरू होते. सूर्याचे उत्तरायन व दक्षिणायन सुद्धा आपल्याला अनुभवता येते. (Longest Day)

हेही वाचा- BEST Bus Strike: ‘बेस्ट’ संपामुळे मुंबईकरांचे हाल, पण मेट्रो मालामाल!

कोणत्याही वस्तूच्या पडणार्या सावलीचे निरीक्षण केल्यास उत्तरायन व दक्षिणायन सहज लक्षात येऊ शकते. पृथ्वीवरील ऋतू सुद्धा पृथ्वीच्या अक्षाच्या कलत्या स्थितीमुळे निर्माण होतात. आकाशात वैषुविक व आयनिक वृत्ताचे दोन काल्पनिक छेदनबिंदू आहे. यापैकी एका बिंदूत २२ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो. याला वसंत संपात दिन असे म्हणतात. तर त्याच्या विरुद्ध बिंदूस २३ सप्टेंबर रोजी सूर्य प्रवेश करतो. याला शरद संपात दिन असे म्हणतात. या दोन्ही दिवशी दिवस व रात्र सारखी असते. (Longest Day)

सर्व खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी २१ जून या उत्तर गोलार्धातील सर्वात मोठ्या दिवसाचे प्रत्यक्ष कालमापन करावे व या १३ तास १३ मिनिटांच्या दिवसाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे. (Longest Day)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.