Chembur मध्ये अल्पवयीन मुलांकडून गांजा विक्रीचे रॅकेट चालवणाऱ्या महिलेला अटक

119
Mumbai Crime : भांडुपमध्ये गुन्हे शाखेचा छापा; 'पाचवी पास' डॉक्टरकडून रुग्णांवर उपचार!
Mumbai Crime : भांडुपमध्ये गुन्हे शाखेचा छापा; 'पाचवी पास' डॉक्टरकडून रुग्णांवर उपचार!

चेंबूर (Chembur) परिसरात अल्पवयीन मुलांना हाताशी धरून गांजाचे जाळे पसरवणाऱ्या ४५ वर्षीय पान टपरी मालकिणीला आरसीएफ (RCF) पोलिसांनी लोणावळ्यातून अटक केली आहे. निसरीन खान असे या संशयित महिलेचे नाव असून, ती पडद्याआड राहून या अमली पदार्थांच्या (Drugs) व्यवसायाचे सूत्रसंचालन करत होती. पोलिसांनी तिला १५ जून रोजी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निसरीन खानने (Nisreen Khan) परिसरात गांजा विकण्यासाठी किमान आठ अल्पवयीन मुलांना भरती केले होते. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी तिने या मुलांना कुरिअर आणि विक्रेते म्हणून वापरले आणि प्रत्येक विक्रीवर कमिशनचे आमिष दाखवले होते. ही मुले प्रामुख्याने परिसरातील ट्रक चालक आणि बेरोजगार तरुणांना लक्ष्य करत होती. अंमली पदार्थ विकताना काही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तेव्हा चौकशीत त्यांनी खानच्या नावाची कबुली दिली.

(हेही वाचा – Nagpur : देशाच्या संरक्षण उत्पादनात महाराष्ट्राचे मोठे योगदान; नागपूरमध्ये स्वदेशी ब्रह्मोस वॉरहेडची निर्मिती)

या रॅकेटचा पर्दाफाश होण्यामागे खानच्याच नातेवाईकांचा मोठा वाटा आहे. कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार करून या बेकायदेशीर व्यवसायाचा पर्दाफाश केला होता. मात्र, पोलिसांच्या कारवाईनंतर खानला संशय आला की, ही माहिती तिच्या बहीण आणि मेहुण्याने दिली आहे. याच रागातून तिने आपल्याच नातेवाईकांवर हल्ला केला. याप्रकरणी तिच्यावर आरसीएफ पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर केले असून, या प्रकरणात अन्य दोन प्रौढांनाही अटक केली आहे. निसरीन खानने अमली पदार्थांच्या व्यवसायातून कमावलेल्या पैशांतून काही मालमत्ता खरेदी केली आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. तसेच या रॅकेटमध्ये आणखी किती मुलांचा समावेश आहे, याचाही शोध घेतला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच अधिक खुलासे होण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.