Dombivli च्या कुख्यात स्वीट ड्रीम बारवर चौथ्यांदा कारवाई; बारबालांसह ३२ जणांवर गुन्हा

96
Mumbai Crime : भांडुपमध्ये गुन्हे शाखेचा छापा; 'पाचवी पास' डॉक्टरकडून रुग्णांवर उपचार!
Mumbai Crime : भांडुपमध्ये गुन्हे शाखेचा छापा; 'पाचवी पास' डॉक्टरकडून रुग्णांवर उपचार!
  • कल्याण : प्रतिनिधी

Dombivli : सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीमध्ये मध्यवर्ती ठिकाणी आलेल्या विक्रांत पॅलेस तथा स्वीट ड्रीम्स या वादग्रस्त बारवर पोलिसांनीआतापर्यंत चौथ्यांदा कारवाई केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक धाड टाकून ३२ जणांची धरपकड केली. तोकडे कपडे परिधान करून अश्लील अंगविक्षेप करत बारमध्ये बसलेल्या ग्राहकांना घायाळ करणाऱ्या बारबाला, तसेच चालक, मालक, ग्राहक आणि व्यवस्थापकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार (Bar) चालविण्यासाठी शासनाने दिलेल्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

डोंबिवली (Dombivli) पूर्वेतील पाथर्ली स्मशानभूमीजवळ असलेल्या आलेल्या विक्रांत पॅलेस तथा स्वीट ड्रीम बारमध्ये नोकरनामा न करता आणि विना परवाना महिला वेटर्सना अश्लिल नृत्य करण्यास भाग पाडून ग्राहकांना आकर्षित करण्यात येत असल्याच्या तक्रारी टिळकनगर पोलिसांना (Tilaknagar Police) प्राप्त झाल्या होत्या. गेल्या आठवड्यात मध्यरात्री दीडच्या सुमारास छापा टाकण्याची तयारी पोलिसांनी पूर्ण केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तेजल पवार, शिवाजी बुनगे, नागराज रोकडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शिवराज चव्हाण, हवालदार घायवट, पवार, कानडे, कांबळे, भोये, सावंत, राठोड, वैद्य, सोनावळे, कनोजे, साळुंखे या पथकाने सदर बारवर अचानक धाड टाकली.

(हेही वाचा – नागपूरमध्ये संरक्षणमंत्री Rajnath Singh यांच्या हस्ते १० हजार टन क्षमतेच्या अत्याधुनिक प्रकल्पाचं भूमिपूजन; पाहा काय आहे वैशिष्ट्य)

पोलिसांनी प्रत्येकाची ओळख परेड घेतली. तोकड्या कपड्यांतील बहुतांशी गायिका वजा बारबाला या पलावा सारख्या अलिशान गृहसंकुलात, तर काही नवी मुंबई (Navi Mumbai) परिसरात राहत असल्याचे निष्पन्न झाले. लोकेश देवेंद्र नाईक, कृष्णा रेड्डी अशी बार मालकांची नावे असून या बारचा व्यवस्थापक म्हणून रणजित रविराज हा काम पाहत आहे आहे. ९ वेटर्स, ८ अश्लिल नृत्य करणाऱ्या गायिका, १० ग्राहक, बार मालक, व्यवस्थापक अशा एकूण ३२ जणांवर टिळकनगर पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम, हाॅटेल व बार अश्लिल नृत्यास बंदी कायद्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बारमध्ये महिला वेटर्स अर्थात बारबाला तोकडे कपडे परिधान करून कानठळ्या बसविणाऱ्या वाद्यवृंदाच्या तालावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लिल नृत्य होत्या.

अटक आरोपींत परप्रांतीयांचा भरणा

सुनीलकुमार यादव, आशिषकुमार यादव, आशिषकुमार दास, विवेककुमार कैकुसिंग, संगम सिंग, अनिलकुमार यादव, अनुराग महतो, लोकेश पुजारी, व्यंकट रमन, उमेश गायकवाड, सैन मलिक, लक्ष्मी सुनार, सिमरन कुमार, आशिया खान, रिता राय, विमला कौर, सायरा अन्सारी, पूजा सिंग, दिनेश जैयस्वाल, सुनील राठोड, राजकुमार उबाळे, जगन्नाथ निवृत्ती शिंदे, योगेश राणे, अनंत पाटकर, सुरज मोरे, वैभव फाळके, अंकुश रोडिया, भरत खिलारे, लोकेश नाईक, कृष्णा रेड्डी, रणजित रविराज अशी गुन्हा दाखल इसमांची नावे आहेत. दर आठवड्याला उपायुक्त अतुल झेंडे (Atul Zende) यांच्या आदेशांवरून कल्याण-डोंबिवलीतील बारवर छापे मारले जात आहेत. या कारवायांमुळे बार चालक/मालकांचे धाबे दणाणले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.