Jammu-Kashmir: शोपियान जिल्ह्यात ३ व्यक्तिंकडून स्फोटक पदार्थ, हिजबुलची पोस्टर्स जप्त; पोलिसांनी केली अटक

74

Jammu-Kashmir: जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात तीन व्यक्तिंकडून स्फोटक पदार्थ आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटेनेचे पो्स्टर्स जप्त करण्यात आले आहेत. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.

दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्याच्या पुद्सू भागात गुरुवारी रात्री पोलिसांनी या तिघांकडून दोन ग्रेनेड, २.५ किलो पीईके, चार मोबाईल फोन आणि दहशतवादी संघटनेशी संबंधित पो्स्टर्स जप्त केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी या व्यक्तींची ओळख ऐजाज अहमद खांडे, अरबाज अहमद मीर आणि नासिर अहमद डार अशी सांगण्यात आली आहे. हे तिघेही शोपियान मधील बेगामा गावचे रहिवासी आहेत. हे तिघेही गेल्या ३१ मे पासून आपल्या घरातून बेपत्ता होते, असेही पुढे सांगण्यात आले.

हेही वाचा – G7 Summit: फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पंतप्रधान मोदींसाठी ‘खास’ हिंदी पोस्ट!

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.