प्रिय मित्र नरेंद्र, G7 शिखर परिषदेसाठी (G7 Summit) तुमचे स्वागत करून आम्हाला आनंद झाला. फ्रान्स आणि भारताची ही मैत्री अमर राहो, असे म्हणत चक्क हिंदीतून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. फ्रान्समध्ये आयोजित वार्षिक जी७ शिखर परिषदेची सांगता झाली. यानंतर पंतप्रधान मोदी यांना निरोप देताना पुढील वर्षी भारतात येईन, असे आश्वासन मॅक्रॉन यांनी दिले. (G7 Summit)
— Emmanuel Macron (@EmmanuelMacron) June 18, 2026
इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पुढे इंग्रजीतून मॅक्रॉन म्हणाले की, मला आशा आहे की, मी योग्य पद्धतीने हिंदी भाषेतून व्यक्त झालो असेन. आपण इथे आलात, त्याबाबत पंतप्रधान मोदी यांना खूप धन्यवाद देतो. आपण आता सगळे परत जात आहात. परंतु, मी आश्वस्त करतो की, पुढील फेब्रुवारी महिन्यात मी भेट देईन. तुम्ही आमचे चांगले मित्र आहात, असे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. (G7 Summit)
मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी फ्रान्स भेटीबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले. त्यावर पंतप्रधान मोदींनी त्यांना सांगितले की, आता त्यांना आपले वचन पूर्ण करून भारतात यावेच लागेल. यावर मॅक्रॉन यांनी उत्तर दिले की, ते पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये नक्कीच भारताला भेट देतील. तत्पूर्वी, इंडिया इनोव्हेट्स २०२६ च्या उद्घाटनावेळी मॅक्रॉन यांनी भारताचे सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे औपचारिकपणे अभिनंदन केले. (G7 Summit)
Cette visite en France a été riche en termes d’échanges et de résultats. Elle a débuté à Nice, où se tenait le programme Bharat Innovates, s’est poursuivie à Évian pour le G7, puis à Paris, où j’ai pris la parole lors de VivaTech 2026 et d’un important programme adressé à la…
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2026
दरम्यान, फ्रान्सची ही भेट विचारांची देवाणघेवाण आणि ठोस निष्पत्तींच्या दृष्टीने अत्यंत फलदायी ठरली आहे. या भेटीची सुरुवात ‘नीस’ शहरात झाली, जिथे ‘भारत इनोव्हेट्स’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ‘एव्हियन’ येथे G7 परिषदेसाठी आणि नंतर पॅरिसमध्ये माझा सहभाग होता; पॅरिसमध्ये मी ‘विव्हाटेक २०२६’ तसेच भारतीय समुदायासाठी आयोजित एका महत्त्वाच्या कार्यक्रमात संबोधित केले आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांची भेट घेतली. माझे मित्र राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन, तसेच तिथले सरकार आणि फ्रान्समधील जनतेने केलेल्या स्वागतासाठी मी विशेष कृतज्ञता व्यक्त करतो. आगामी काळात भारत-फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. (G7 Summit)
Join Our WhatsApp Community

