वडोदरा, (Namaz Controversy) गुजरात येथील एसएसजी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभाग इमारतीत तिघांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नमाज पठणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आता रुग्णालय प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. (Namaz Controversy)
हेही वाचा-अमेरिका-इराण युद्ध समाप्त! Donald Trump -पजशकियान यांच्यात शांतता करारावर स्वाक्षऱ्या
टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, एसएसजी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रंजन अय्यर यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. “विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे”, असे अय्यर म्हणाले. डायलिसिसचे उपचार घेणाऱ्या एका रुग्णाबरोबर हे लोक आले असल्याचे डॉ. अय्यर पुढे म्हणाले. नातेवाईक नमाज पठण करत असल्याचा व्हिडीओ कोणीतरी रेकॉर्ड केला आणि नंतर तो सोशल मीडियावर अपलोड केला, असेही त्यांनी सांगितले. (Namaz Controversy)
”संबंधित व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर फिरत असून आम्ही सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी ओपीडी इमारतीच्या तळमजल्यावर घडली. व्हिडिओमध्ये दिसणारे लोक एका रुग्णाचे नातेवाईक असल्याचे समजते,” असे डॉ. अय्यर यांनी स्पष्ट केले. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे माहिती अधीक्षकांनी दिल्याचे टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे. (Namaz Controversy)
Join Our WhatsApp Community

