Vile Parle Accident : अनियंत्रित इलेक्ट्रिक कारने ३ दुचाकींना चिरडले; एका महिलेचा मृत्यू, दोघे जखमी

168
दुर्घटनाग्रस्त इलेक्ट्रिक कार व आसपासचे लोक
Vile Parle Accident : अनियंत्रित इलेक्ट्रिक कारने ३ दुचाकींना चिरडले; एका महिलेचा मृत्यू, दोघे जखमी
  • प्रतिनिधी 

Vile Parle Accident           विलेपार्ले (पूर्व) येथील वि. स. खांडेकर रोड परिसरात बुधवारी सायंकाळी एका इलेक्ट्रिक कारने तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका ४१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर कारचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. (Vile Parle Accident)

(हेही वाचा – मोदी पंतप्रधान असताना भारतावर हल्ला झाल्यास अमेरिका भारताच्या पाठीशी उभी राहील, Donald Trump यांचे आश्वासन)

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, १७ तारखेला सायंकाळी ५:०० च्या सुमारास विलास श्रीधर गव्हाणकर (वय ४४) हा आपल्या ताब्यातील इलेक्ट्रिक कार (क्रमांक MH 01 DX 9125) चालवत होता. मोगीबाई मार्केट, रेल्वे स्टेशन रोड येथे असताना अचानक कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. कार स्वयंचलित (ऑटोमॅटिक) असल्याने ती थेट समोर उभ्या असलेल्या तीन दुचाकींवर जाऊन आदळली. (Vile Parle Accident)

(हेही वाचा – Dr. Ashwini Joshi यांच्या बदलीला स्थगिती)

या दुर्घटनेत किंजल हिरेन शहा (वय ४१) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर निर्मला डोजिया आणि प्रेमजी डोजिया हे दोन इसम जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तात्काळ गावडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवण्यात आली असून, सध्या या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. पोलिसांनी कारचालक विलास गव्हाणकर याच्यावर निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. (Vile Parle Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.