इराण (Iran) आणि अमेरिका यांच्यातील अणुकरारावर १९ जून रोजी जिनिव्हा येथे स्वाक्षरी होणार आहे. करार झाल्यानंतर इराणला (Iran) जप्त केलेला निधी मिळेल असे बोलले जात आहे. परंतु दोन वेगवेगळ्या माध्यमांच्या वृत्तांनुसार करार होण्यापूर्वीच इराणला ९ अब्ज डॉलर्स मिळाले आहेत. हा निधी मिळवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर अमेरिकेचे नियंत्रण होते म्हणजेच अमेरिकेला याची पूर्ण कल्पना होती असेही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
ज्या देशांनी इराणला (Iran) पैसे पाठवले आहेत त्यात कतार आणि संयुक्त अरब अमिरात हे प्रमुख देश आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यात कतार मध्यस्थाच्या भूमिकेत आहे. अणुकरारानंतर इराणच्या २४ अब्ज डॉलरची रक्कम अनफ्रीज करण्यात येणार आहे. म्हणजेच करारानंतर इराणला २४ अब्ज डॉलर्स रक्कम मिळेल. इराणचे हे पैसे अमेरिकेच्या सांगण्यावरून जगातील इतर देशांनी जप्त केले होते. ज्या देशांनी इराणचे (Iran) पैसे जप्त केले, त्यात अमेरिका, ब्रिटन, कतार, तुर्की, दक्षिण कोरिया, चीन आणि भारत यांचा समावेश होता. त्याशिवाय काही परदेशी बँकांमध्येही इराणचा पैसा आहे. जवळपास १२० अब्ज डॉलर्स रक्कम जप्त असल्याचे इराणने दावा केला आहे.
संयुक्त अरब अमिरातने अमेरिका आणि इराण (Iran) यांच्यातील करारापूर्वी ३ अब्ज डॉलर इराणला दिलेत. हे पैसे करारानुसार देण्यात आले होते. इराणने यानंतर यूएईवर कुठलाही हल्ला केला नाही. परंतु पैसे दिल्याचे वृत्त यूएईने फेटाळले आहे. UAE इराणला १० अब्ज डॉलर देणार असल्याचे रिपोर्टमध्ये आले आहे. त्याशिवाय कतारकडूनही इराणला पैसे मिळाल्याचा दावा केला आहे. दरम्यान, कतारने इराणचे जे पैसे जप्त केले होते, ते अनफ्रीज केले आहेत असे वृत्त इस्रायलच्या वृत्तसंस्थेने दिले. कतारजवळ इराणचे (Iran) एकूण १२ अब्ज डॉलर रक्कम जप्त आहे. त्यातील निम्मी रक्कम कतारने अनफ्रीज केली आहे. एकूण मिळून इराणला अमेरिकेसोबत करार होण्याआधीच ९ अब्ज डॉलर रक्कम मिळाली आहे. या व्यवहारावर अमेरिकेचे लक्ष आहे. इराणच्या चर्चेचे प्रमुख गालिबाफ यांचे सल्लागार मोहम्मदी यांच्या म्हणण्यानुसार सध्या केवळ आखाती देशच इराणला पैसे देतील. करार झाल्यानंतर अमेरिका इराणला निधी देऊ शकते. परंतु अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनीही या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. युरेनियम संवर्धनाचा टप्पा पूर्ण झाल्यावर इराणला ३०० अब्ज डॉलर्स दिले जातील. ही रक्कम तेहरानला विकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दिली जाईल असं त्यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community

