IND VS PAK Womens T20 world cup 2026 : भारताच्या १७१ धावांचे लक्ष्य गाठताना पाकिस्तान १०६ धावांवरच झाला गारद

दीप्ती शर्माने ५ विकेट घेऊन पाकिस्तानचा अर्धा संघ माघारी पाठवला आणि भारत ६४ धावांनी पहिला सामना जिंकला. 

77
Indian women's cricket team celebrates a wicket against Pakistan.
Indian players celebrate a crucial wicket during the match.

भारतीय संघ रविवार, १४ जूनला आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ (IND VS PAK Womens T20 world cup 2026) मधील आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्धचा सामना बर्मिंगहॅम येथील एजबास्टन स्टेडियमवर खेळला. त्यावेळी भारतीय संघाने पाकिस्तानसमोर विजयासाठी १७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र हे लक्ष्य गाठताना पाकिस्तानचा संघ अवघ्या १०६ धावांवरच गारद झाला. यात दीप्ती शर्माने ५ विकेट घेऊन पाकिस्तानचा अर्धा संघ माघारी पाठवला आणि भारत ६४ धावांनी पहिला सामना जिंकला.

भारतीय संघाला अद्याप महिला टी-२० विश्वचषक(IND VS PAK Womens T20 world cup 2026)   जिंकता आलेला नाही. त्यांची सर्वोत्तम कामगिरी २०२० च्या विश्वचषकात झाली होती, जेव्हा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता. आता, भारत आपल्या पहिल्या महिला टी-२० विश्वचषक विजयावर लक्ष ठेवून आहे. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही, पॉवरप्लेमध्ये दोन विकेट पडल्या. पहिल्याच षटकात फिरकी गोलंदाज सादिया इक्बालने शेफाली वर्माला बाद केले. डावखुरी वेगवान गोलंदाज तस्मिया रुबाबच्या गोलंदाजीवर जेमिमा रॉड्रिग्स बाद झाली. येथून स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची शानदार भागीदारी केली. (IND VS PAK Womens T20 world cup 2026)

(हेही वाचा जागतिक पातळीवर भारताचा डंका; आयुष मंत्रालयाचा थेट ‘योग’ प्रक्षेपणात नवा Guinness World Record )

स्मृती मंधानाने ४४ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा केल्या. स्मृतीची विकेट रमीन शमीमने घेतली. भारती फुलमाली फार काही करू शकली नाही आणि सादिया इक्बालने तिला १ धावेवर बाद केले. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर फातिमा सनाच्या गोलंदाजीवर बाद झाली. हरमनप्रीत कौरने चार चौकारांच्या मदतीने ३५ चेंडूंमध्ये ३६ धावांचे योगदान दिले. यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोषने त्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत भारतीय संघाला चांगली धावसंख्या उभारण्यास मदत केली. रिचाने १७ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एका षटकारासह ३४ धावा केल्या. शेवटच्या षटकात पाकिस्तानी कर्णधार फातिमा सनाच्या गोलंदाजीवर घोष बाद झाली. (IND VS PAK Womens T20 world cup 2026)

पाकिस्तानची फलदांजी सुरु झाली तेव्हा दीप्ती शर्माने डावाच्या पाचव्या षटकात गल फिरोझाला बाद करून भारताला पहिली विकेट मिळवून दिली. फिरोझाने ९ चेंडूंमध्ये १२ धावा केल्या आणि मुनीबा अलीसोबत ३८ धावांची सलामीची भागीदारी केली. पाकिस्तानने पॉवरप्लेमध्ये एक विकेट गमावली पण ५० धावा पूर्ण केल्या. (IND VS PAK Womens T20 world cup 2026)  पॉवरप्लेनंतरच्या पुढच्याच षटकात (७ व्या) दीप्ती शर्माने आयेशा जफरला बाद केले. स्मृती मंधानाने एक अप्रतिम झेल घेतला. आयेशा १२ धावांवर बाद झाली. जबीन ही तिसरी विकेट होती. पाकिस्तानचा डाव अर्धा संपला होता. त्यानंतर दीप्ती शर्माने अक्षरशः पाकिस्तानच्या एका पाठोपाठ एक महिला फलंदाजाला माघारी पाठवून ५ विकेट घेऊन पाकिस्तानचा सगळं संघ अवघा १०६ धावांवर गारद केला. आतापर्यंत भारतीय आणि पाकिस्तानी महिला संघांमध्ये १६ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या काळात भारतीय संघाने १३ सामने जिंकले, तर पाकिस्तानने केवळ तीन सामने जिंकले. महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही संघ आठ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. या काळात भारताने ६ सामने जिंकले आणि पाकिस्तानने २ सामने जिंकले. (IND VS PAK Womens T20 world cup 2026)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.