Mumbai: मुंबईतील स्मशानभूमी प्रदूषणमुक्त होणार, हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पालिकेचे महत्त्वपूर्ण पाऊल

77
Mumbai: मुंबईतील स्मशानभूमी प्रदूषणमुक्त होणार, हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पालिकेचे महत्त्वपूर्ण पाऊल
Mumbai: मुंबईतील स्मशानभूमी प्रदूषणमुक्त होणार, हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पालिकेचे महत्त्वपूर्ण पाऊल

Mumbai: मुंबईतील वायुप्रदूषण रोखण्यासाठी आणि हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ई शहर भागातील स्मशानभूमीमधून वायूचे उत्सर्जन रोखण्यासाठी तेथे ‘कार्बनमुक्त स्मशानभूमी वायुप्रदूषण नियंत्रण प्रणाली’ (कॅप्स) बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

या अत्याधुनिक यंत्रणेचा पुरवठा आणि स्थापना करण्यासाठी पालिकेच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागातर्फे ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे हवेची गुणवत्ता सुधारणार आहे. वाढत्या नागरीकरणामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.
पारंपरिक स्मशानभूमींमध्ये लाकडांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर कार्बन, राख आणि विषारी वायू हवेत पसरतात. प्रस्तावित अत्याधुनिक ‘कॅप्स’ यंत्रणेमुळे स्मशानभूमीतून निघणाऱ्या धुराचे हवेत मिसळण्यापूर्वीच संपूर्ण शुद्धीकरण केले जाईल. यामुळे मुंबईतील, विशेषतः निवासी स्मशानभूमींच्या परिसरातील वायू प्रदूषण शून्यावर आणण्यास मदत होऊन हवेची गुणवत्ता सुधारेल. पर्यावरण रक्षण आणि नागरिकांचे आरोग्य अधिक सुरक्षित होणार आहे. या पर्यावरणपूरक निर्णयामुळे कार्बन उत्सर्जनात मोठी घट होणार आहे. कार्बन न्यूटुल शहराच्या दिशेने मुंबईची वाटचाल सुरू होईल. पावसाळ्यातही काम राहणार अखंडित सुरू राहणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पावसाळ्याचा कालावधी गृहीत धरून नऊ महिन्यांची मर्यादित मुदत निश्चित करण्यात आली आहे. पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेमुळे प्रदूषणकारी कण जमिनीलगत साचून राहण्याचा धोका जास्त असतो. हा धोका टाळण्यासाठी आणि पावसाळ्याच्या दिवसांतही यंत्रणा सक्षमपणे काम करू शकेल, अशा पद्धतीने हे काम वेगाने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यावर महापालिका सुमारे १७ कोटी ७० लाख रुपये खर्च करणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.