IPL 2026 : महत्त्वाच्या साखळी सामन्यापूर्वी कोलकाताला धक्का; अंगक्रिश रघुवंशी जायबंदी

IPL 2026 : तो आयपीएलमधून बाद झाला आहे. 

78
अंगक्रिश रघुवंशी दुखापतीनंतरचा क्षण
IPL 2026 : महत्त्वाच्या साखळी सामन्यापूर्वी कोलकाताला धक्का; अंगक्रिश रघुवंशी जायबंदी
  • ऋजुता लुकतुके

IPL 2026                 कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलच्या निर्णायक टप्प्यात मोठा धक्का बसला आहे. संघाचा युवा फलंदाज अंगक्रिश रघुवंशी दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर झाला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली होती. कोलकातानं अधिकृत निवेदन जारी करत अंगक्रिशला डोक्याला चेंडू बसण्याबरोबरच डाव्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती दिली. झेल घेण्याच्या प्रयत्नात ही दुखापत झाल्याचं संघानं स्पष्ट केलं. त्यामुळे आता उर्वरित आयपीएल हंगामात तो खेळू शकणार नाही. (IPL 2026)

(हेही वाचा – Green Card Application : ग्रीन कार्डाचा अर्ज आता मायदेशातूनच भरावा लागणार)

यंदाच्या हंगामात अंगक्रिश कोलकातासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक ठरला होता. १३ सामन्यांत त्यानं ४२२ धावा करत सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्याच्या नावावर पाच अर्धशतकं असून मधल्या फळीत त्यानं संघाला अनेकदा सावरलं होतं. त्यामुळे बाद फेरीच्या शर्यतीत असलेल्या कोलकातासाठी ही मोठी चिंता मानली जात आहे. संघाचा शेवटचा साखळी सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे आणि राजस्थानने मुंबईविरुद्घचा सामना गमावल्यास कोलकाताला बाद फेरीची आशा असेल आणि अशावेळी अंगक्रिश संघाबरोबर नसणं हा संघाला मोठा धक्का असेल. एरवी संघाचं आव्हान संपुष्टात आल्यात जमा आहे. (IPL 2026)

(हेही वाचा – Virat Kohli : ‘आयपीएल पार्टीवरून विराटला अनेकदा ओरडलो आहे,’ विराटच्या कोचचा धक्कादायक खुलासा)

मुंबईविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाल्यानंतर अंगक्रिशला चक्कर, मानदुखी आणि डोकेदुखीचा त्रास जाणवत असल्याची माहिती सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन यानी दिली होती. त्यानंतर वैद्यकीय तपासणीत त्याला कन्कशनसोबत फ्रॅक्चरही झाल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान, कोलकातासाठी रविवारी रात्री होणारा दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा अखेरचा सामना प्रतिष्ठेचा आहे. अशा वेळी अंगक्रिशसारखा फॉर्मात असलेला फलंदाज बाहेर पडणं संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. (IPL 2026)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.