-
कल्याण, प्रतिनिधी
Dombivli डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात गणपतीचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने शिरकाव करून चोरट्याने मोठ्या खुबीने तेथील दानपेटीतून रकमेची चोरी केली. हा प्रकार मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. मंदिराच्या खजिनदाराने सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार पाहिला. वेळ न दवडता खजिनदाराने ही माहिती दिल्यानंतर या चोरट्याला दोघा भाविकांनी मोठ्या शिताफिने पकडून मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. दानपेटीतील नोटा अलगद बाहेर काढण्यासाठी चोरट्याने क्लृप्ती लढवली होती. एका पातळ काडीला गम लावून ती काडी दानपेटीत टाकून त्या माध्यमातून नोटा बाहेर काढण्याचे तंत्र अवलंबिले होते. (Dombivli)
(हेही वाचा – Neeraj Chopra : नीरज, मनू भाकरच्या परदेशात प्रशिक्षणासाठी निधी मंजूर)
निवासी विभागातील सिद्धिविनायक मंदिर हे भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या मंदिरात गणपतीचे दर्शन घेण्यासाठी शहर व आसपासच्या परिसरातील भाविक येत असतात. देवदर्शन आणि विरंगुळ्यासाठी येणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह महिलांचा समावेश असतो. मंदिरातील गणेश मूर्तीच्या समोरच दानपेटी आहे. भाविक स्वेच्छेने दानपेटीत पैसे टाकतात. सहज कुणाला उघडता येऊ नये किंवा चोरट्यांना पळवता येऊ नये यासाठी सदर दानपेटी गाभाऱ्यासमोरील स्टिलच्या खांबाला वेल्डिंगने जोडण्यात आली आहे. (Dombivli)
(हेही वाचा – Sugar Export Ban : केंद्र सरकारकडून साखर निर्यातीला बंदी; भारताला काय होणार फायदा ? वाचा…)
या मंदिरात शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मंदिरात कुणीही भाविक नव्हता. हे पाहून एक चोरटा मंदिरात घुसला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या टापूत असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. चोरट्याने त्याच्याकडील गम लावलेली पातळ काडी दानपेटीत टाकली. या काडीच्या साह्याने त्याने लागोपाठ दोन नोटा बाहेर काढल्या. मात्र बाहेर काहीतरी हालचाल होत असल्याचे जाणवताच चोरट्याने चोरटा मंदिराबाहेर धूम ठोकली. हा प्रकार ऑनलाईन सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सिद्धिविनायक मंदिराचे खजिनदार चंद्रशेखर शिंदे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ मंदिराकडे धाव घेतली. तेवढ्यात तेथे दर्शनासाठी पांडुरंग उडे आले होते. या दोघांनी चोराला मंदिरातच जखडून ठेवले. तू येथे काय करत होतास? असे विचारताच चोराची बोबडी वळली. तरीही पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चोरट्याला चंद्रशेखर शिंदे आणि पांडुरंग उडे या दोघांनी पकडून ठेवले. या प्रकाराची माहिती देताच मानपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन चोरट्याला ताब्यात घेतले. (Dombivli)
(हेही वाचा – देशभरातील तुरुंगांत कैद असलेल्या ISIS च्या १९ संशयितांची ‘ईडी’ कडून चौकशी)
कल्याण-डोंबिवलीतील मंदिरे असुरक्षित
सुनील बाबू (४५) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून तो मुंबईच्या घाटकोपर येथील भटवाडी भागात जलाराम मंदिराच्या बाजूला असलेल्या काजूगर सोसायटीत राहणारा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्याने अशा पद्धतीने किती ठिकाणी चोऱ्या केल्या? त्याच्या विरोधात अन्य पोलिस ठाण्यांत चोऱ्या घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत का? आदी प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या सहकाऱ्यांनी तपास चक्रांना वेग दिला आहे. कल्याण-डोंबिवलीतील मंदिरे असुरक्षित असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. गेल्या वर्षभरात चोरट्यांनी कल्याण-डोंबिवलीतील अनेक मंंदिरांमध्ये दानपेट्यांतील रक्कमा, चिल्लर, गाभाऱ्यातील मूर्ती, धातूचे सामान चोरून नेले आहे. अलीकडच्या काळात कल्याणमध्ये नागरी वस्तीतील दोन-तीन मंदिरांमध्ये चोरट्यांनी चोऱ्या केल्या आहेत. या चोऱ्यांमध्ये अटक केलेल्या चोरट्याचा सहभाग आहे का? याचाही चौकस तपास पोलिस करत आहेत. (Dombivli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

