
-
कल्याण, प्रतिनिधी
Kalyan Crime सद्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. त्यापाठोपाठ अनेक भोंदूबाबांच्या कहाण्या चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. अशातच कल्याणातही तळपायाची आग मस्तकात जाणारा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. पूजा-पाठ करून घरातील बाधा दूर करण्याच्या बहाण्याने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ७८ वर्षीय शाहिद शेखला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर कल्याणमध्ये एकच खळबळ माजली आहे. (Kalyan Crime)
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत अल्पवयीन मुलगी कल्याण पश्चिमेत आईसोबत राहते. या मुलीच्या आजी आणि वडिलांचा गेल्या दीड-दोन वर्षांत लागोपाठ मृत्यू झाला आहे. पिडीत मुलीची आई या शाहिद शेखकडे गेली असता तुमच्या घरात बाधा असल्याचे सांगत शाहिद शेखने घराची शांती पूजा करावी लागणार असल्याचा सल्ला दिला. शाहिद शेखच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन पिडीत मुलीच्या आईने त्याला घरी बोलावले. पूजा-पाठ करण्याच्या बहाण्याने घरी आलेल्या या शाहिद शेखची वासनांध नजर मुलीवर पडली होती. हा शाहिद शेख संधीची वाट पाहत होता. (Kalyan Crime)
(हेही वाचा – जनरेटरच्या स्फोटाने Dombivli Railway Station हादरले)
एकेदिवशी मुलगी घरात एकटीच होती. ही संधी साधून शाहिद शेख घरी आला. या मुलीवर अत्याचार करून शाहिद शेख पसार झाला. घरी परतलेल्या आईला मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकून तिच्या आईला मोठा धक्का बसला. तिने तात्काळ मुलीसह खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या दोघी माय-लेकीला धीर दिला. त्यानंतर मात्र पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन आरोपी शाहिद शेख याला अटक केली. त्याच्याविरोधात जादूटोणा विरोधी कायदा, पोक्सो कायदा आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kalyan Crime)
विशेष म्हणजे पिडीत मुलीची आई घरात नसताना हा शाहिद शेख २ वेळा त्यांच्या घरी गेला आणि त्याने पिडीत मुलीवर अत्याचार केला. या संदर्भात कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाने यांनी सांगितले की, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी वेगवेगळ्या अंगाने तपास सुरू केला आहे. आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून अधिक चौकशी सुरू आहे. (Kalyan Crime)
(हेही वाचा – Maharashtra Heat Alert: पुढील 3 दिवस ‘या’ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा; उष्णतेचा पारा अधिकच वाढणार)
अंधश्रद्धेचा फायदा घेऊन होणाऱ्या या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनीही नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही भोंदूबाबाच्या नादी लागू नका. संशयास्पद प्रकार दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधा. आरोपी शाहिद शेखने केलेल्या कृत्याची सत्यता पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला आहे. बदमाश शाहिद शेखने यापूर्वी अशा पद्धतीने आणखी काही प्रकार केले आहेत का? याचाही चौकस तपास पोलिस करत आहेत. (Kalyan Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
