महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या 29व्या मलबार हिल चषक 2026 क्रिकेट स्पर्धेला (Cricket Matches) खेळाडू आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संजय शिर्के प्रतिष्ठान, श्री सदगुरू साईनाथ मित्र मंडळ काली माता नगर आणि श्री वाळकेश्वर माघी गणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे (Cricket Matches) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली उपस्थित होते. त्यांनी आयोजकांचे अभिनंदन करत अशा क्रीडा स्पर्धांमुळे (Cricket Matches) युवकांना प्रोत्साहन मिळते तसेच सामाजिक एकोपा अधिक दृढ होतो, असे मत व्यक्त केले.
या स्पर्धेत (Cricket Matches) रुपेश इलेव्हन संघाने शानदार खेळ करत प्रथम पारितोषिक पटकावले. विजेत्या संघाला 22 हजार 222 रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. श्री सदगुरू साईनाथ मित्र मंडळ, काली माता नगर संघाने द्वितीय क्रमांक मिळवत 15 हजार 555 रुपयांचे पारितोषिक जिंकले. तर जबरेश्वर मित्र मंडळ, जबरेश्वर गल्ली संघाने तृतीय क्रमांक पटकावत 7 हजार 777 रुपयांचे पारितोषिक मिळविले. स्पर्धेत (Cricket Matches) उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तसेच मॅन ऑफ द सिरीज पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
(हेही वाचा David Warner : मद्य पिऊन गाडी चालवल्याची डेव्हिड वॉर्नरची कबुली, काय शिक्षा होणार?)
स्पर्धेच्या (Cricket Matches) यशस्वी आयोजनासाठी सम्राट वाळकेश्वरचा सम्राट संजय शिर्के, सतीश मौसम, बबलू शेख, निखिल चौधरी आणि गणेश कवाटिया यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेदरम्यान खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. मलबार हिल परिसरात गेली 29 वर्षे सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेमुळे स्थानिक क्रिकेटपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community


