मुंबई
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज साम्राज्यावर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रहार केला आहे. दाऊदचा उजवा हात आणि ड्रग्ज सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार सलीम डोला(Salim Dola)याला तुर्कीतून यशस्वीरित्या भारतात आणण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी एका विशेष विमानाने त्याला दिल्लीच्या विमानतळावर उतरवण्यात आले. अमली पदार्थ नियंत्रण कक्ष (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो)ने सलीम डोला याचा ताबा घेतला असून बुधवारी त्याला मुंबईत आणले जाणार आहे. डोलाच्या अटकेमुळे डी-कंपनीच्या आर्थिक नाड्या आवळण्यात यंत्रणांना मोठे यश आले आहे.(Salim Dola)
सलीम डोला याला तुर्कीमधील इस्तंबूल शहरात एका अत्यंत गोपनीय मोहिमेअंतर्गत ताब्यात घेण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा आणि भारतीय गुप्तचर विभागाच्या समन्वयामुळे डोलाला भारतात डिपोर्ट (हद्दपार) करण्यात यश आले आहे. सध्या दिल्लीत केंद्रीय गुप्तचर संस्था आणि मुंबई एनसीबीची (NCB) टीम त्याची कसून चौकशी करत आहे.(Salim Dola)
(हेही वाचा – AI Powered Smart Glasses : हँड्स-फ्री भविष्य आणि स्मार्टफोनचा शेवट? )
सलीम डोलावर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रामुख्याने खालील ड्रग्ज कारखान्यांच्या प्रकरणांत तो मुख्य मास्टरमाइंड आहे.सांगली ड्रग्ज फॅक्टरी,मैसूर (कर्नाटक) ड्रग्ज फॅक्टरी आणि तेलंगणा ड्रग्ज फॅक्टरी मुंबई गुन्हे शाखा (Mumbai Crime Branch) लवकर या गुन्ह्यात त्याचा ताबा एनसीबी कडून घेऊन त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती मुंबई क्राईम ब्रांचच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.मंगळवारी भारतात आणलेल्या सलीम डोलाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने अटक केली असून मुंबई एनसीबीचे अधिकारी डोलाला घेऊन मुंबईकडे रवाना झाले असून बुधवारी त्याला मुंबईत आणले जाणार आहे.(Salim Dola)
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार डोलाला अटक करण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात असून, लवकरच त्याचा ताबा एनसीबी कडून घेतले जाईल.”डोला हा परदेशात बसून भारतातील सिंथेटिक ड्रग्जची पुरवठा साखळी (Supply Chain) नियंत्रित करायचा. त्याच्या अटकेमुळे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटमधील अनेक बड्या धेंडांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.” असे एका तपास अधिकारी (नाव न सांगण्याच्या अटीवर) सांगितले.(Salim Dola)
दाऊदच्या ‘फंडिंग’चे रहस्य उलगडणार?
सुरक्षा यंत्रणांच्या मते, सलीम डोला हा केवळ ड्रग्ज तस्कर नसून दाऊद टोळीच्या ‘फंडिंग’चा मुख्य कणा होता. ईडीने (ED) त्याच्याविरुद्ध आधीच मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. तो हवालाच्या माध्यमातून ड्रग्जचे पैसे परदेशात पोहोचवत असे. भारतात सक्रिय असलेले डी-कंपनीचे हस्तक आणि ड्रग्जचे मार्ग (Routes) यांची माहिती त्याच्याकडून मिळण्याची शक्यता आहे.(Salim Dola)
एनसीबीने डोलावर यापूर्वीच बक्षीस जाहीर केले होते. आता त्याच्या अटकेमुळे दाऊद इब्राहिमच्या गँगला आणि त्यांच्या अंमली पदार्थांच्या काळ्या व्यापाराला जबरदस्त सुरुंग लागला आहे.(Salim Dola)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

