
-
प्रतिनिधी
BJP on Sanjay Raut विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीवरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले असून, भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मते फुटू शकतात, असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. हा इशारा म्हणजे प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांच्या पराभवाची भीती असून, महाविकास आघाडीत मोठी फूट पडणार असल्याचे हे संकेत आहेत, असा दावा नवनाथ बन यांनी केला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (BJP on Sanjay Raut)
(हेही वाचा – Ghatkopar मध्ये पोलिसांवर जमावाचा हल्ला; एकाचा हात फॅक्चर, तणावानंतर गुन्हे दाखल)
संजय राऊत यांनी उमेदवारी संदर्भात केलेल्या ‘बाळंतपणाच्या खोली’च्या विधानाचा समाचार घेताना बन म्हणाले की, “तुमच्या पक्षाची भूमिका वांझोटी असल्याने जनतेने तुम्हाला आधीच नाकारले आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांत तुम्हाला यश मिळाले नाही, त्यामुळे जनतेच्या दृष्टीने तुम्हीच अपयशी ठरला आहात.” तसेच, उद्धव ठाकरे यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसने राज्यसभेच्या जागेची अट घातल्याचा दावा करत, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची तोंडे तीन दिशेला असल्याची टीकाही त्यांनी केली. महायुतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि सुनेत्रा अजित पवार हे अत्यंत मजबुतीने एकत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (BJP on Sanjay Raut)
(हेही वाचा – Pune Crime News: नामांकित महाविद्यालयात विद्यार्थ्यावर रॅगिंग, ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल)
मणिपूर आणि पश्चिम बंगालच्या मुद्द्यावरूनही नवनाथ बन यांनी राऊतांना धारेवर धरले. “ज्यांना चंद्रपूर महापालिकेतील नगरसेवक आणि सत्ता सांभाळता आली नाही, त्यांनी मणिपूरच्या गप्पा मारू नयेत,” असा टोला त्यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे कार्यकर्त्यांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे नेते आहेत, तर उद्धव ठाकरे निवडणुकीच्या काळात केवळ घरात बसून राहतात, अशी टीका करत त्यांनी महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आणला. महाविकास आघाडीत सध्या एकमताचा अभाव असून विधानसभा निवडणुकीपूर्वीच या आघाडीची मते फुटणार हे निश्चित असल्याचे बन यांनी ठासून सांगितले. (BJP on Sanjay Raut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
