Pune Crime News: नामांकित महाविद्यालयात विद्यार्थ्यावर रॅगिंग, ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

140
Crime News: डेटिंग अॅपवरील मैत्री पडली महागात! ५५ दिवसांत साडेतीन कोटी रुपयांचा गंडा, सायबर ब्यूरोचा नागरिकांना सावध राहण्याचा इशारा
Crime News: डेटिंग अॅपवरील मैत्री पडली महागात! ५५ दिवसांत साडेतीन कोटी रुपयांचा गंडा, सायबर ब्यूरोचा नागरिकांना सावध राहण्याचा इशारा

Pune Crime News: पुणे शहरातील नामांकित ‘आयएलएस विधी महाविद्यालया’च्या (ILS Law College) मुलांच्या वसतिगृहात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी ‘एलएलबी’च्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या पाच विद्यार्थ्यांविरुद्ध ‘महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यां’तर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra anti-ragging laws)

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा ३५ वर्षीय विद्यार्थी असून तो आयएलएस लॉ कॉलेजमध्ये (ILS Law College) ‘एलएलबी’च्या (LLB) द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. तो महाविद्यालयाच्या रस्त्यावरील मुलांच्या वसतिगृहात राहतो. त्याच वसतिगृहात राहणाऱ्या इतर पाच विद्यार्थ्यांनी त्याच्याशी गैरवर्तन करत शिवीगाळ केली तसेच मानसिक त्रास देत रॅगिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थ्याने काही महिन्यांपूर्वी डेक्कन पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन तक्रार नोंदवली होती.

हेही वाचा  – Digital Census Security : हायटेक जनगणनेचा ‘डिजिटल’ फॉर्म्युला; माहिती सुरक्षिततेसाठी ६-स्तरांचे सुरक्षा कवच

पीडित विद्यार्थ्याची तक्रार
या अर्जाच्या आधारे पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. चौकशीत रॅगिंग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अखेर संबंधित पाच विद्यार्थ्यांविरुद्ध ‘महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेबाबत पीडित विद्यार्थ्याने महाविद्यालय प्रशासनाकडेही तक्रार दिली होती. मात्र, प्रशासनाने यावर नेमकी कोणती कारवाई केली, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

डेक्कनकडून अधिक तपास सुरू
पोलिसांकडून महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधून याबाबत अधिक माहिती घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये (Institutions of Higher Education) रॅगिंगविरोधी कडक नियम असतानाही असे प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, डेक्कन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.