Employee Pay: ई-केवायसी करणे आवश्यकच, वित्त विभागाची कर्मचाऱ्यांना तंबी

87
Employee Pay: ई-केवायसी करणे आवश्यकच, वित्त विभागाची कर्मचाऱ्यांना तंबी
Employee Pay: ई-केवायसी करणे आवश्यकच, वित्त विभागाची कर्मचाऱ्यांना तंबी

Employee Pay: कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरणातील घोळाला अटकाव करण्यासाठी तसेच एका कर्मचाऱ्याला एका महिन्यात एकदाच वेतन व्हावे, यासाठी शासनाने सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती सेवार्थ प्रणालीमध्ये भरली आहे. त्यानुसार, वेतन करता यावे, यासाठी प्रत्येकाने ई-केवायसी (E-KYC) करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित बँकांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते. ई-केवायसी न झाल्यास संबंधितांचे एप्रिल व मे महिन्याचे वेतन होणार नाही, अशी तंबीच वित्त विभागाने दिली आहे. (Finance Department)

शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या दरमहा वितरित करण्यात येणाऱ्या वेतनात अनेक प्रकारचे घोळ होतात. बऱ्याच वेळा हे घोळ जाणीवपूर्वक केले जात असल्याच्याही तक्रारी यापूर्वी झाल्या आहेत. एखाद्या कर्मचाऱ्याची बदली झाल्यास पूर्वीच्या व नव्या नावाने रुजू झालेल्या अशा दोन्ही ठिकाणाहून त्याचे वेतन होऊ शकते. कर्मचारी रजेवर असल्यास त्या कालावधीतील आणि तो पुन्हा रुजू झाल्यास रजेच्या कालावधीतील वेतन दिले जाते. तसेच कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास पेन्शन आणि वेतन दोन्ही मिळते, हे घोळ मिटवताना संबंधितांची नंतर दमछाक होते, तसेच शासनाचे पैसे अडकून पडतात. या प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी शासन स्तरावर अविरत प्रयत्न सुरू होते.

हेही वाचा – Murder : ‘एन्काऊंटर’चा सूड २७ वर्षांनी; काकाच्या हत्येचा बदला पुतण्याने घेतला

दरम्यान, सेवार्थ प्रणाली विकसित करण्यात येऊन सर्व नियमित शासकीय अधिकारी-कर्मचारी यांची माहिती त्यात भरण्यात आली आहे. सदर माहितीमध्ये त्यांच्या बँक खात्याच्या माहितीसोबत संबंधित कर्मचाऱ्याचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक नोंदवलेला आहे. एकंदर पूर्ण माहितीमध्ये कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांची दुबार माहिती सेवार्थ प्रणालीत नोंद होऊ नये, तसेच कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यास दुबार वेतन अदा होऊ नये, याकरिता शासनाने ठोस उपाययोजना केली आहे. त्याला अनुसरून सर्व प्रशासकीय विभागातील सर्व आहरण व संविरण अधिकारी (DDO)यांना शासनाने सूचित केले आहे.

प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने (employees) ई-केवायसी व्यक्तिश: पूर्ण करून त्याचे प्रमाणपत्र अहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे जमा करणे आवश्यक आहे. यानंतर हे प्रमाणपत्र सेवार्थ प्रणालीत देण्यात आलेल्या ई-केवायसी अपडेशन रिपोर्टमध्ये (updation report) नोंद केली जाईल. यावेळी बँक खात्याचा तपशील व सेवार्थ प्रणालीत नोंदवण्यात आलेला तपशील या दोन्हीमध्ये साम्य असणे गरजेचे आहे. या आदेशानंतर सर्व संबंधितांचे धाबे दणाणले असून बँकांमध्ये हाऊसफुल्ल गर्दी झालेली दिसून येते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.