नोएडा येथे पगाराच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात भडकाऊ पोस्ट केल्याबद्दल RJDच्या प्रवक्त्या प्रियंका भारती (Priyanka Bharti) आणि कंचना यादव (Kanchana Yadav) यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. (Noida Violent Protests) त्यांनी मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शहडोल जिल्ह्यातील एका जुन्या व्हिडिओला नोएडाचा असल्याचे सांगून शेअर केले होते. या व्हिडिओमध्ये पोलिसांकडून आंदोलनकर्त्याला मारहाण केली जात असल्याचे दिसत होते.
मध्यप्रदेश के शहडोल जनपद के बुढार थाना क्षेत्र में एक युवक द्वारा नशे की अवस्था में हंगामा किए जाने की घटना के वीडियो को भ्रामक रूप से जनपद गौतमबुद्ध नगर की घटना बताकर कतिपय सोशल मीडिया एकाउंट से प्रसारित किया जा रहा है, जो पूर्णतः असत्य एवं भ्रामक है।
सभी… pic.twitter.com/4wHkrBlM4h
— UP POLICE (@Uppolice) April 14, 2026
(हेही वाचा – Narishakti Vandan Act : देशाची भूमिती बदलणारे ‘मोदी’ अन् घरच्या चौकटीत अडकलेले ‘ठाकरे-पवार’!)
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) पोलिसांनी यापूर्वीच या व्हिडिओचा फॅक्टचेक केला होता. पोलिसांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचे स्पष्ट करत सांगितले की, हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील घटनेचा आहे. तो गौतमबुद्ध नगरचा असल्याचे भासवून सोशल मीडियावर प्रसारित केला जात होता, जे पूर्णपणे चुकीचे आहे.
पोलिसांनी RJD प्रवक्त्या प्रियंका भारती आणि कंचना यादव यांच्यासह भडकाऊ पोस्ट करणाऱ्या इतर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांविरोधातही FIR नोंदवली आहे. (Noida Violent Protests)


