मंत्र्यांची बदनामी करण्यासाठी ‘Fake video’चा आधार; तृतीयपंथी व्यक्तीच्या तक्रारीनंतर सख्ख्या भावावर गुन्हा दाखल

110
मंत्र्यांची बदनामी करण्यासाठी 'Fake video'चा आधार; तृतीयपंथी व्यक्तीच्या तक्रारीनंतर सख्ख्या भावावर गुन्हा दाखल
मंत्र्यांची बदनामी करण्यासाठी 'Fake video'चा आधार; तृतीयपंथी व्यक्तीच्या तक्रारीनंतर सख्ख्या भावावर गुन्हा दाखल

सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या एका कथित मंत्र्यासोबतच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आता एक नवीन वळण आले आहे. याप्रकरणी संबंधित ट्रान्सजेंडर (तृतीयपंथीय) व्यक्तीने दक्षिण मुंबईतील (South Mumbai) कफ परेड पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्याच भावाविरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत गुन्हा (FIR) दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारमधील एका मंत्र्यासोबत एका ट्रान्सजेंडर व्यक्तीचा व्हिडिओ (Fake video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता या व्हिडिओतील मूळ तक्रारदार व्यक्तीने पोलिसांत तक्रार करत धक्कादायक खुलासा केला आहे.

(हेही वाचा – Iphone Price Hike : आयफोनच्या किंमती वाढणार? ग्राहकांना मिळणाऱ्या सवलती संपुष्टात येणार?)

तक्रारदार व्यक्तीने आरोप केला आहे की, तिच्या सख्ख्या भावानेच तिला धमकावले होते. अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागात नोकरी मिळवून देण्यासाठी त्याने तिच्याकडे तगादा लावला होता.

“जर मला नोकरी मिळवून दिली नाही, तर तुझे व्हिडिओ (Fake video) सोशल मीडियावर व्हायरल करेन,” अशी धमकी भावाने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित व्हायरल व्हिडिओ हा मूळ स्वरूपात नसून, तिची बदनामी करण्याच्या हेतूने तो ‘एडिट’ (संपादित) करून पसरवण्यात आला असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीवरून कफ परेड पोलिसांनी आरोपी भावाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ७९( महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करणे, कलम ३५१(२): गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे, माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act):कलम ६६(ई) आणि ६७(ए): गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“आम्ही या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहोत. व्हिडिओ (Fake video) नेमका कोणी एडिट केला आणि तो पसरवण्यामागे आरोपीचा नेमका काय सहभाग आहे, याची तांत्रिक तपासणी केली जात आहे,” असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.