Crime : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरुणीवर कोयत्याने हल्ला; वाचवायला गेलेला मित्र जखमी

97
मंत्र्यांची बदनामी करण्यासाठी 'Fake video'चा आधार; तृतीयपंथी व्यक्तीच्या तक्रारीनंतर सख्ख्या भावावर गुन्हा दाखल
मंत्र्यांची बदनामी करण्यासाठी 'Fake video'चा आधार; तृतीयपंथी व्यक्तीच्या तक्रारीनंतर सख्ख्या भावावर गुन्हा दाखल

Crime : मुंबईतील मुलुंड परिसरात एका कॉलेजबाहेर बुधवारी सकाळी भररस्त्यात थरार पाहायला मिळाला. एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात तरुणीचा मित्र मध्ये आल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. मुलुंड पोलिसांनी (Mulund Police) घटनेच्या २४ तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त केला आहे. (Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी आशिष गौतम बनसोडे (२१, रा. बदलापूर पूर्व) हे एकमेकांचे जुने ओळखीचे आहेत. बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास पीडित मुलगी मुलुंड येथील तिच्या कॉलेजमध्ये आली होती. यावेळी आरोपी आशिष तिथे पोहोचला. त्याने मागून येऊन पीडितेच्या गळ्यात हात टाकून तिला पकडले आणि “तू माझ्याशी का बोलत नाहीस?” असा जाब विचारत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. (Crime)

(हेही वाचा – वर्षभरात जेवढे Pollution होते तेवढे Iran Israel War मधील १४ दिवसांत झाले; जर वर्षभर युद्ध चालले, तर…)

रागाच्या भरात आशिषने स्वतःजवळ असलेला लोखंडी कोयता काढून पीडितेवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेचा मित्र वेळीच मध्ये आल्याने कोयत्याचा वार त्याच्या मानेच्या पाठीमागील भागावर लागला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. या घटनेनंतर आरोपीने सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने शिवीगाळ करत दहशतीचे वातावरण निर्माण केले. (Crime)

घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११८(१), ७८, ३५१(३) सह भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत आरोपी आशिष बनसोडे (Ashish Bansode) याला २४ तासांच्या आत अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला धारदार कोयताही हस्तगत करण्यात आला आहे. (Crime)

आरोपी आशिष हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत:

  • बदलापूर पोलीस ठाणे: अंमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS) अंतर्गत गुन्हा (२०२३).
  • बदलापूर पोलीस ठाणे: मारामारी आणि बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी गुन्हा (२०२६).

तसेच एक अदखलपात्र गुन्हाही त्याच्या नावावर आहे. पोलिसांनी आज आरोपीला न्यायालयात हजर केले असून, या प्रकरणाचा पुढील तपास मुलुंड पोलीस करत आहेत. कॉलेज परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Crime)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.