Iran Israel War मध्ये आता अरब देशांची उडी; अमेरिकेच्या बाजूने घेतला मोठा निर्णय

सुरुवातीला सौदी, यूएई, कतार, कुवेत, बहरीन आणि ओमान हे देश इराणशी राजनैतिक चर्चा करून तणाव कमी करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, इराणने थेट आखाती देशांच्या आर्थिक कणा असलेल्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले सुरू केले.

106
Arab leaders discussing strategies amid Iran Israel War
Arab nations are strategizing in response to the Iran Israel War.

सध्या सुरु असलेल्या Iran Israel War मध्ये इराणची सर्व बाजूने कोंडी करण्यासाठी सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांनीही या युद्धात उडी घेतली आहे. त्यांनी आता अमेरिकेच्या बाजूने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या युद्धाला वेगळे वळण येण्याची शक्यता आहे. संपूर्ण आखाती देश युद्धात उतरल्याने मध्य पूर्वेत मोठा संहार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना  (Iran Israel War) प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशांमधील ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केल्यानंतर, आतापर्यंत तटस्थ राहणाऱ्या सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीने इराणविरुद्ध मोठे पाऊल उचलले आहे. सौदीने अमेरिकन सैन्याला आपला महत्त्वाचा हवाई तळ वापरण्याची परवानगी दिली असून, यूएई इराणची अब्जावधी डॉलर्सची मालमत्ता गोठवण्याच्या तयारीत आहे.  (Iran Israel War) युद्धाच्या सुरुवातीपासून सावध भूमिका घेणाऱ्या सौदी अरेबियाने आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. इराणकडून होणाऱ्या सततच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे सौदीने अमेरिकन हवाई दलाला किंग फहद हवाई तळ वापरण्याची अधिकृत परवानगी दिली. या निर्णयामुळे अमेरिकेला इराणवर थेट आणि प्रभावीपणे लष्करी कारवाई करणे सोपे होणार आहे.

(हेही वाचा धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा आणि आरक्षणाचे लाभ होणार रद्द; Supreme Court चा ऐतिहासिक निकाल )

केवळ लष्करीच नव्हे तर आर्थिक आघाडीवरही इराणची कोंडी केली जात आहे. संयुक्त अरब अमिराती आपल्या वित्तीय प्रणालीतील इराणची अब्जावधी डॉलर्सची मालमत्ता गोठवण्याचा विचार करत आहे. आधीच प्रचंड महागाई आणि निर्बंधांमुळे होरपळणाऱ्या इराणसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे इराणची युद्ध (Iran Israel War)  क्षमता आर्थिकदृष्ट्या कमकुवत होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला सौदी, यूएई, कतार, कुवेत, बहरीन आणि ओमान हे देश इराणशी राजनैतिक चर्चा करून तणाव कमी करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, इराणने थेट आखाती देशांच्या आर्थिक कणा असलेल्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले सुरू केले. यात प्रामुख्याने कतारच्या रास लाफान गॅस हबवर झालेला मोठा हल्ला निर्णायक ठरला. शिवाय, इराणने जगातील सर्वात महत्त्वाच्या होर्मुझची सामुद्रधुनी मार्गावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत तिथे अनधिकृत वाहतूक शुल्क आकारण्याचे संकेत दिले आहेत. एवढेच नव्हे तर, इराणच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे या देशांच्या तेल, वायू आणि पर्यटन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. (Iran Israel War)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.