- प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचे केंद्र आता विदर्भाकडे सरकत असून, आगामी २-३ महिने राज्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहेत. नागपूरच्या ‘अॅडव्हांटेज विदर्भ-२०२६’ परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाच्या कायापालटाचा असा ‘रोडमॅप’ सादर केला, ज्यामुळे केवळ गुंतवणूकच नाही तर रोजगाराचा मोठा पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. (Advantage Vidarbha-2026 Conference)
भविष्यासाठी ७ नवीन ‘फ्युचर रेडी’ धोरणे
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र आता केवळ उद्योगांना निमंत्रण देत नाही, तर त्यांच्यासाठी भविष्योन्मुख धोरणे (Future Ready Policies) तयार करत आहे. येत्या तीन महिन्यांत टेक्सटाईल, इलेक्ट्रॉनिक्स, डिफेन्स, एरोस्पेस, फार्मास्युटिकल आणि बायो-प्लास्टिक अशा ७ महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी नवीन धोरणे जाहीर केली जातील. यामुळे गुंतवणूकदारांना स्पष्ट दिशा मिळेल आणि राज्याची अर्थव्यवस्था अधिक गतीने धावेल. (Advantage Vidarbha-2026 Conference)
गडचिरोली होणार भारताचे ‘स्टील हब’ एकेकाळी केवळ नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता देशाचे ‘स्टील हब’ बनण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. पुढील १० वर्षांत येथे पोलाद निर्मितीची विक्रमी क्षमता निर्माण होईल. विशेष म्हणजे, पर्यावरणाचे रक्षण करत ‘ग्रीन स्टील’ निर्मितीवर भर दिला जाणार असल्याने हा जिल्हा जागतिक नकाशावर झळकणार आहे. (Advantage Vidarbha-2026 Conference)
(हेही वाचा – Mumbai Local : मुंबईतील ८८ लोकल गाड्या तीन महिन्यांसाठी राहणार बंद; नेमकं कारण काय?)
१०,८३१ कोटींचे करार आणि ६ हजार नोकऱ्या
या परिषदेत केवळ चर्चा झाल्या नाहीत, तर १०,८३१ कोटींचे तीन मोठे सामंजस्य करारही प्रत्यक्षात आले :
- गॅलक्सी सोलर : १० हजार कोटींची गुंतवणूक (सौर ऊर्जा क्षेत्र).
- महामेट्रो व केअर हॉस्पिटल : ६०० कोटींचे बहुविशेषोपचार रुग्णालय.
- जीआर इन्फ्रास्ट्रक्चर : २०० कोटींची टेलिकॉम क्षेत्रात गुंतवणूक. या प्रकल्पांमुळे विदर्भातील तब्बल ६ हजार तरुणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. (Advantage Vidarbha-2026 Conference)
जागतिक स्तरावर महाराष्ट्राचा डंका
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या परिषदेला २२ देशांचे राजदूत आणि प्रतिनिधी उपस्थित होते. अदानी समूहाची ‘कोल गॅसीफिकेशन’ मधील गुंतवणूक आणि सोलर मॉड्युल मधील नागपूरची प्रगती यामुळे विदर्भ आता देशाची ‘एनर्जी आणि लॉजिस्टिक कॅपिटल’ म्हणून उदयास येत आहे. “आम्ही केलेले करार केवळ कागदावर नसून ते जमिनीवर उतरवणारे आहेत,” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. (Advantage Vidarbha-2026 Conference)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

