महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. बारामतीजवळ त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाले आहेत. फोनवरून ही बातमी देताना युगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाले. बारामती मेडिकल कॉलेजच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे. आमदार रोहित पवार मेडिकल कॉलेज परिसरात दाखल झाले आहेत. या वेळी रोहित पवारांनाही अश्रू अनावर झाले. कार्यकर्त्यांकडून मोठा आक्रोश करण्यात येत आहे.
(हेही वाचा – Ajit Pawar plane crash : महाराष्ट्राच्या राजकारणातील परखड आणि धाडसी ‘दादा’ पर्व संपले! बारामतीच्या मातीत लोकनेत्याचा करुण अंत)
युगेंद्र पवार फोनवर बोलत असताना त्यांना रडू आवरत नव्हतं. युगेंद्र पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचे कौटुंबिक संबंध हे अत्यंत जिव्हाळ्याचे होते. अजित पवारांच्या जाण्यानंतर आता युगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाले आहेत.
कर्तृत्ववान नेता हरपला
कर्तृत्ववान, वक्तशीर नेते म्हणून प्रसिद्ध असलेले अजित पवार यांच्या निधनाची ही बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाला चटका लावून जाणारी आहे. शरद पवारांनी अजित पवारांना राजकारणात आणलं होतं. आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड हा अजित पवार यांच्या नावे आहे. अत्यंत कार्यक्षम मंत्री असा त्यांचा लौकिक होता. दिलखुलास स्वभाव, कायम काम करण्याची वृत्ती आणि उत्तम वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र अजित पवारांच्या राजकारणाला आता पोरका झाला आहे. अजित पवार हे त्यांच्या दमदार भाषणासाठी आणि मिश्किली शैलीसाठी प्रसिद्ध होते. कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला होता. अजित पवार भाषण करायला उभे राहायचे तेव्हा लोकांना आपलंसं करून घेण्याची त्यांची शैली होती. अजित पवार यांनी कायमच लोकांची विविध कामं केली आहेत. तसंच ते त्यांच्या कार्यक्षमतेसाठी प्रसिद्ध होते.
कसा झाला अपघात ?
राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. आज अजित पवार यांचा बारामती दौरा होता. या बारामती दौऱ्यासाठी आज सकाळी बारामतीसाठी त्यांनी प्रस्थान केले होते. बारामतीमध्ये विमान लाँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान अपघातग्रस्त झाले. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जण होते आणि या सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे विमान लँडिंगदरम्यान नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले. काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्यात आले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी नागरी विमान वाहतूक विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

