मुंबई हे देशातील आर्थिक केंद्र असून येथे गुन्हेगारीचे जाळेही मोठ्या प्रमाणावर पसरलेले आहे. एक काळ होता जेव्हा मुंबईत अंडरवर्ल्डचं जाळं पसरलं होतं. ९० चं दशक हे मुंबईसाठी अत्यंत कठीण गेलं. आजही वरवर सगळं स्वच्छ आहे असं वाटत असलं तरी आतून काही गोष्ती पोखरलेल्या आहेत. (Drug Racket)
ड्रग्जचं जाळंही मुंबईला वेढा घालत आहे. मात्र गेल्या काही वर्षांत मुंबई पोलिसांनी ड्रग्जविरोधी कारवायांमध्ये मोठे यश मिळवले आहे. विशेषतः २०२५ मध्ये झालेल्या कारवाईत तब्बल ४०० कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. ही कारवाई केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित नव्हती, तर कर्नाटकातील म्हैसूरपर्यंत पोहोचली होती. यावरून स्पष्ट होते की, हे रॅकेट केवळ मुंबईपुरते मर्यादित नसून राज्याबाहेरही पसरलेले आहे. (Drug Racket)
(हेही वाचा – Accident : पंढरपूर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; ४ भाविकांचा मृत्यू)
तपासात समोर आलेला पहिला महत्त्वाचा धागा म्हणजे गुप्त फॅक्टऱ्यांचा उलगडा. साकीनाका परिसरात रंग तयार करणाऱ्या गोडाऊनमध्ये पोलिसांनी छापा टाकला असता तेथे ड्रग्ज उत्पादन सुरू असल्याचे आढळले. रंगांच्या व्यवसायाच्या आडून एमडी ड्रग्ज तयार केले जात होते. या कारवाईतून पोलिसांनी ४४ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. यावरून स्पष्ट होते की, ड्रग्ज उत्पादन करणारे गट आपला व्यवसाय लपवण्यासाठी कायदेशीर उद्योगांचा आडोसा घेतात. (Drug Racket)
दुसरा महत्त्वाचा धागा म्हणजे इंटरस्टेट नेटवर्क. मुंबईतून सुरू झालेल्या तपासाचा धागा कर्नाटकातील म्हैसूरपर्यंत पोहोचला. तेथेही पोलिसांनी छापे टाकून ड्रग्ज जप्त केले. यावरून स्पष्ट होते की, हे रॅकेट राज्यांच्या सीमांपलीकडे पसरलेले आहे आणि विविध ठिकाणी त्यांची उत्पादन व वितरण केंद्रे आहेत. (Drug Racket)
(हेही वाचा – India – EU Trade Pact : युरोपीयन युनियनबरोबरच्या व्यापारी कराराचा भारताला सुरुवातीलाच ५ अब्ज अमेरिकन डॉलरचा फायदा)
तिसरा धागा म्हणजे स्थानिक व परदेशी संपर्क. मुंबई आणि नवी मुंबईत झालेल्या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून असे दिसून आले की, या रॅकेटचे काही धागे परदेशातही पोहोचलेले आहेत. ड्रग्जची मागणी केवळ स्थानिक बाजारात नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरही आहे. त्यामुळे हे रॅकेट अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. (Drug Racket)
या तपासातून आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे स्थानिक गुन्हेगारी गटांचा सहभाग. मुंबईतील काही स्थानिक गट या रॅकेटमध्ये थेट सहभागी असल्याचे पुरावे मिळाले आहेत. हे गट उत्पादन, साठवणूक आणि वितरण यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होते. ड्रग्ज रॅकेट उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी जप्ती तर केल्याच, पण त्याचबरोबर आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. ड्रग्ज विक्रीतून मिळणारा पैसा कोणत्या मार्गाने वापरला जातो, कोणत्या खात्यांमध्ये जमा होतो, याचा तपास सुरू आहे. यामुळे मनी लॉन्डरिंगचे नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. (Drug Racket)
(हेही वाचा – Madhya Pradesh : हिंदू विद्यार्थ्यांकडून करवून घेतले मशिदीचे मॉडेल; पालकांमध्ये संतापाची लाट)
या कारवाईतून स्पष्ट झाले की, ड्रग्ज रॅकेट हे बहुपातळीवर कार्यरत असते. उत्पादन, वितरण, विक्री आणि आर्थिक व्यवहार या सर्व टप्प्यांवर वेगवेगळे गट काम करतात. पोलिसांनी या सर्व टप्प्यांचा उलगडा करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली आहेत. सामाजिक दृष्टिकोनातून पाहता, मुंबईसारख्या महानगरात ड्रग्ज रॅकेट पसरणे ही चिंताजनक बाब आहे. तरुणांमध्ये ड्रग्जचे व्यसन वाढत असल्याचे अहवाल सांगतात. त्यामुळे अशा रॅकेट्सवर कठोर कारवाई करणे ही काळाची गरज आहे. (Drug Racket)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

