मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कुल येथे ७६वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2026) सोमवार, २६ जानेवारी या दिवशी सकाळी ठीक ९.३० वाजता मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी ध्वजारोहण आणि ध्वज संचलन हे विशेष आकर्षण असणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विभागाच्या गणित विभागाच्या प्रमुख शिरीष अत्रे आणि बँक ऑफ बडोदाचे निवृत्त अधिकारी अलका गोडबोले उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला (Republic Day 2026) महाराष्ट्र मिलिटरी स्कुलचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांची प्रमुख उपस्थित असणार आहे. हा संपूर्ण सोहळ्याचे वृत्तांकन हिंदुस्थान पोस्ट करणार आहे. तेव्हा नक्की हिंदुस्थान पोस्टवर पहा आणि वाचा मुरबाड येथील मिलिटरी स्कुलमध्ये होणारा हा अनोखा प्रजासत्ताक दिन सोहळा! (Republic Day 2026)

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सतत सैनिकीकरणाचा पुरस्कार केला. सावरकरी विचारांचा वारसा जपणारे त्यांचे कृतिशील अनुयायी विक्रम नारायण सावरकर यांनी सुरु केलेल्या या सैनिकी शाळेत छोटे सैनिक घडवले जात आहेत. या शाळेतला प्रत्येक मुलगा शूर, धाडसी, काटक, कणखर आहे. कारण मुलांना शाळांमध्ये कसे घडवायला हवे, त्यांना काय शिकवायला हवे हे या शाळेला नीट उमगले आहे. 200 मुलांच्या या निवासी शाळेतला प्रत्येक मुलगा कराटे करू शकतो, योगासने करू शकतो, मल्लखांब करू शकतो, उंच मनोरे उभारू शकतो, अडथळ्यांची शर्यत पार करू शकतो, वॉल क्लायम्बिंग, रॅपलिंग करू शकतो आणि आगीच्या वर्तुळातून चपळाईने उड्या मारू शकतो. उन्हात उभे राहून संचलन, वेगवेगळी प्रात्यक्षिके केल्यानंतरही त्याच उत्साहात, अगदी संध्याकाळपर्यंत चालणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो. रंगरंगोटी करून अगदी मुलींच्या वेशातही रंगमंचावर सहजतेने वावरतो. (Republic Day 2026)
मुलांची ही चुस्ती, स्फूर्ती कोणत्याही प्रतिथयश शाळांतल्या मुलांमध्ये बघायला मिळणार नाही. पंचतारांकित सुविधा या शाळेत नसतील पण लाखो रुपये शुल्क आकारणाऱ्या शाळेत नसतील अशा सुविधा या शाळेत आहेत. कारण रणजित सावरकर नावाचा, वीर सावरकरांसारखीच दूरदृष्टी असलेला, अतिशय व्यासंगी संचालक या शाळेला लाभला आहे. इथे मुलांना खेळायला तीन मैदाने आहेत, हॉकीसाठी टर्फ आहे म्हणूनच हॉकीच्या ध्यानचंद ट्रॉफीवर सलग तीन वर्ष याच शाळेचे नाव कोरलेले आहे. 200 च्या वर विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर हॉकीमध्ये शाळेचे प्रतिनिधित्व केले आहे. मुष्टियुद्ध, धावण्याच्या शर्यतीतही ही मुले विजयी होत आहेत. ती उत्तम चित्र तर काढतातच पण छान रांगोळ्यासुद्धा रेखाटतात आणि शास्त्रातल्या विविध प्रयोगांचे प्रदर्शनही भरवतात. या शाळेचा दहावीचा निकाल 100% लागतोच, पण महाराष्ट्र मिलिटरी स्कुलचा प्रत्येक वर्ग हा तीन वर्षांपूर्वीच डिजिटल झाला आहे त्यामुळे त्यांना विषयाचे सर्वांगीण ज्ञान मिळते. मुलांसाठी इथे उत्तम मेस आहे. त्यांना चौरस आहार मिळतो आहे. (Republic Day 2026)
इथे स्वच्छ मोकळी हवा, हुंदडायला भरपूर जागा आहे. इथे रणरणते ऊन आहे, भरपूर पाऊस आहे आणि बोचरी हवाही आहे. समोर देखणी पर्वतांची रांग आहे. ‘या डोंगराळ, खडकाळ भागात सावरकरांनी नंदनवन फुलवले आहे. अगदी सैन्य दलासारखेच या मुलांचे संचलन असते आणि काय अप्रतिम हॉकी खेळतात ही मुले’ अशी मनसोक्त इथले पोलीस निरीक्षक गिरी यांनी दिली. आई-वडिलांना आवरायला कठीण झालेली अनेक मुले या शाळेत शिकल्यामुळे उत्तम मार्गाला लागली आहेत.इथले सर्व शिक्षक या मुलांसाठी जी मेहनत घेतात त्यालाही विशेष दाद द्यायला हवी. त्याचबरोबर या शाळेत पाठवायला तयार झालेल्या पालकांचेही कौतुक करायला हवे. कारण माझा मुलगा काळवंडले, तो पडेल, रडेल, त्याला लागेल अशी चिंता न करता त्यांनी मुलांना या शाळेत घातले आहे. (Republic Day 2026)
मुलांना उत्तमात उत्तम सुविधा देण्याची इथल्या व्यवस्थापनाची इच्छा आहे. पण दुर्दैवाने जिथे कल्पकता असते, दूरदृष्टी असते तिथेच पैशाची कमतरता असते. त्यामुळे सुजाण नागरिक घडवणाऱ्या या शाळेच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. त्या हातांना पैशाचे पाठबळ दिले पाहिजे. ज्या मुलांना या शाळेत जायचे आहे पण फी भरता येत नाही अशांच्या फी ची जबाबदारी आपण घेऊ शकतो. शाळेला आवश्यक वस्तू प्रायोजित करू शकतो. मार्ग खूप आहेत, गरज आहे ती आपल्या पुढाकाराची.
या मुलांना पुढे सैन्यात जाणे सोपे जाईल कारण त्यासाठी आवश्यक शारीरिक, मानसिक ताकद, स्वयंशिस्त त्यांच्याकडे आहेच. पण जरी सैन्यात गेले नाहीत, तरी आयुष्याच्या कुठल्याही प्रवाहात ते तारून जातील. त्यांना नैराश्य ग्रासणार नाही. एक सजग नागरिक, भारतमातेचा लढवय्या मर्द शिलेदार म्हणूनच ते जगाला सामोरे जातील. (Republic Day 2026)
Join Our WhatsApp Community


