Virat Kohli : विराट कोहली खरंच गर्विष्ठ आहे का, अजिंक्य रहाणेनं दिलं हे उत्तर ?

41
Virat Kohli : विराट कोहली खरंच गर्विष्ठ आहे का, अजिंक्य रहाणेनं दिलं हे उत्तर ?
Virat Kohli : विराट कोहली खरंच गर्विष्ठ आहे का, अजिंक्य रहाणेनं दिलं हे उत्तर ?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सलग दोनदा उपविजेतेपद पटकावलं, तेव्हा विराट कोहली(Virat Kohli)आणि अजिंक्य रहाणे ही कसोटीतील जोडगोळी भारतीय संघाचा आधार होती. विराटकडे नेतृत्व तर अजिंक्यकडे उपकप्तानी होती. दोघांनी बराच काळ भारतीय ड्रेसिंग रुममध्ये एकत्र घालवला आहे. अशावेळी अलीकडेच अजिंक्य रहाणेनं विराट कोहलीच्या स्वभावाविषयीचे काही अनोळखी पैलू लोकांना उघड करून सांगितले. कोहलीची धावांसाठीची भूक आणि खेळावरील प्रेम या गुणांच्या व्यतिरिक्त त्याचा आणखी एक गुण विराटला इतरांपेक्षा वेगळं करतो, असं अजिंक्य रहाणेचं म्हणणं आहे.(Virat Kohli)

(हेही वाचा – Municipal Corporation Election 2026: उमेदवारांची धाकधूक वाढली! राज्यातील २९ महापालिकांसाठी प्रचाराचा शेवटचा दिवस )

हा गुण सांगताना अजिंक्यने चक्क विराटचा ताठा किंवा मग्रुरी या स्वभाव वैशिष्ट्याचा उल्लेख केला. पण त्याचवेळी विराटच्या ताठ्याकडे चुकीच्या नजरेनं पाहिलं जात असल्याचंही त्याने बोलून दाखवलं आहे. ‘विराटबद्दल आपण कितीही बोललो तरी ते कमीच आहे. त्याचं प्रेम, सकारात्मकता याची नेहमी चर्चा होते. पण, मला त्याचा ताठा आवडतो. ताठा हा खरंतर त्याचा दृष्टिकोण आहे. नवीन शिकण्याचा, कधीही हार न मानण्याचा दृष्टिकोण हाच त्याचा ताठा आहे. लोकांना तो मग्रुर वाटतो. पण, तो तसा नाही,’ असं अजिंक्य म्हणाला.(Virat Kohli)

 

View this post on Instagram

 

A post shared by Cricbuzz (@cricbuzzofficial)

सामना सुरू होण्यापूर्वीचं कोहलीचं वागणं त्याने अधोरिखित केलं. ‘विराट सामना सुरू होण्यापूर्वी ड्रेसिंग रुममध्ये कोशात जातो. तो अचानक संघातील इतर खेळाडूंशी बोलणं – चालणं बंद करतो. तो अबोल होतो. पण, ही त्याची तयारीची पद्धत आहे. पण, ही शांतता म्हणजे त्याच्यातील अहंकार नव्हे. तो सामन्यापूर्वी स्वत:शीच संवाद साधत असतो. दोन दिवस आधीपासून त्याचं हे वागणं बदलताना मी पाहिलं आहे,’ असं रहाणे क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला आहे.(Virat Kohli)

क्रिकेटमध्ये अनेक विक्रम नावावर करूनही विराट नवीन शिकण्यासाठी उत्सुक असतो. आणि कामाप्रती निष्ठा तसंच तयारीतील शिस्त विराटने कधीही सोडली नाही, यासाठी रहाणेनं विराटचं कौतुक केलं आहे.(Virat Kohli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.