- ऋजुता लुकतुके
बडोद्या जवळच्या कोटांबी गावात बांधलेल्या नवीन स्टेडिअमवरील हा पहिला एकदिवसीय सामना होता. आणि खेळपट्टीवर सुरूवातीपासून असलेल्या काही भेगा आणि ३४ षटकांनंतर एकच चेंडू दोन्ही बाजूंनी वापरायचा नियम यामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड (Ind vs NZ) मालिकेतील पहिल्या सामन्यात चांगलेच रंग भरले. हल्ली एकदिवसीय सामन्यांत पहिली ३४ षटकं दोन बाजूंनी दोन वेगवेगळे चेंडू वापरण्यात येतात. त्यानंतर गोलंदाजी करणारा संघ उर्वरित १६ षटकांसाठी त्या दोनपैकी एक चेंडू निवडतो. त्यामुळे दोन्ही डावांमध्ये ३४ व्या षटकानंतर सामन्याला कलाटणी मिळालेली तुम्ही पाहिली असेल. (Ind vs NZ, ODI Series)
बडोद्यामध्येत दोन्ही डावांत तसं झालं. भारताला तर हा धक्का विराट कोहलीच्या (Virat Kohli) बळीच्या रुपाने भोगावा लागला. ४० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर लाँगऑफला सीमारेषेवर कुणीही नाही असं पाहून विराट हवेत चेंडू फटकावायला गेला. आणि नेमका मिडऑफच्या ब्रेसवेलला तो पार करू शकला नाही. त्यामुळे ९१ चेंडूंत ९३ धावा करून विराट बाद झाला. एरवी आपलं ८५ वं शतक तो करणारच आणि भारताला आरामात विजयपथावर नेणार अशीच तेव्हा परिस्थिती होती. विजयासाठी ३०१ धावा हव्या असताना भारताची अवस्था २ बाद २३४ अशी होती. पण, विराट बाद झाल्यावर श्रेयस अय्यर (४९), रवींद्र जडेजा (४) आणि हर्षित राणा (२९) धावांवर बाद झाले. आणि सामन्यात रंगत निर्माण झाली. काईल जेमीसनने १० षटकांत ४१ धावा देत ४ गडी बाद केले. आणि तिथे अचानक न्यूझीलंडला थोडीफार आशा निर्माण झाली. पण, अखेर पाठदुखी असताना वॉशिंग्टन सुंदर मैदानात आला आणि त्याने नाबाद ७ तर के एल राहुलने नाबाद २९ धावा करत भारताला ४ गडी राखून विजयी केलं. (Ind vs NZ, ODI Series)
(हेही वाचा – Thackeray Brothers Sabha : आम्ही अस्सल मराठी बोलणारे देशभक्त हिंदू; उद्धव ठाकरेंनी भाजपाला डिवचलं)
1ST ODI. India Won by 4 Wicket(s) https://t.co/pX6HYz772x #TeamIndia #INDvNZ #1stODI @IDFCfirstbank
— BCCI (@BCCI) January 11, 2026
एरवी पुन्हा एकदा हा सामना पाठलागांचा बादशाह असलेल्या विराट कोहलीनेच गाजवला. रोहित २६ धावा करून बाद झाल्यावर ९ व्या षटकांत तो फलंदाजीला आला. आणि त्याने जम बसवायला फारसा वेळ घेतला नाही. आधी शुभमन गिलसोबत त्याने ११८ धावांची भागिदारी केली. आणि गिल ५६ धावा करून बाद झाल्यावर त्याने श्रेयसबरोबर आणखी ७७ धावा जोडल्या. नेहमीप्रमाणे पाठलाग करताना तो पूर्णपणे नियंत्रणात होता. आणि त्याने ३०१ धावांच्या लक्ष्याचं दडपण येऊ दिलं नाही. (Ind vs NZ, ODI Series)
पण, अचानक जेमीसनच्या एका चेंडूने त्याचा घात केला. तरी कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८,००० धावांचा टप्पा पार केलाच. आता सचिन तेंडुलकर पाठोपाठ तो दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने कुमार संगकाराला मागे टाकलं आहे. त्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाने ८ बाद ३०० धावा केल्या त्या डेरिल मिचेलच्या (Daryl Mitchell) ७१ चेंडूंत ८४ धावांच्या खेळीमुळे. त्याने ३ षटकार आणि ८ चौकार ठोकले. याव्यतिरिक्त डेवॉन कॉनवे (५६) आणि हेन्री निकोल्स (६२) यांनी शतकी सलामी संघाला करून दिली. पण, खेळपट्टीवर भेगा असल्यामुळे गोलंदाजांचे काही चेंडू चकवत होते. धावांची गती कमी होती. ती मिचेलनेच वाढवली. ख्रिस्टियन क्लार्कने १७ चेंडूंत २४ धावा करत संघाला तीनशे पार नेलं. भारताकडून सिराज, राणा आणि प्रसिध कृष्णा या तेज त्रिकुटाने प्रत्येकी दोन बळी घेतले. (Ind vs NZ, ODI Series)
९३ धावा करणारा विराट कोहलीच सामनावीर ठरला. आणि भारताने मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली. आता दुसरा एकदिवसीय सामना १४ जानेवारीला राजकोट इथं होणार आहे. (Ind vs NZ, ODI Series)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

