Ration Card धारकांनो लक्ष द्या! आता ताटात ज्वारी कमी अन् गहू जास्त; पाहा नवीन नियमानुसार तुम्हाला किती धान्य मिळणार?

49
Ration Card
Ration Card

नवीन वर्षाच्या सुरुवातीला सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (रेशन) धान्य वाटपात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार रेशन दुकानांवर (Ration shop) मिळणारी ज्वारी आता पूर्णपणे बंद केली आहे. याशिवाय तांदूळ आणि गहू यांच्या प्रमाणात फेरबदल करण्यात आला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम लाखो रेशन कार्डधारकांवर होणार आहे. (Ration Card)

(हेही वाचा – Municipal Election : ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी मतदान आता होणार अधिक सुखकर; मदतीसाठी ४ हजार ५०० ‘पोलिंग एजंट’ नियुक्त)

यापूर्वी प्राधान्य योजनेंतर्गत प्रतिसदस्य ३ किलो तांदूळ व २ किलो गहू मिळत होता, तर अंत्योदय योजनेत (Antyodaya Yojana) एकूण ३५ किलो धान्य दिले जात होते. मात्र, सुधारित निर्णयानुसार आता तांदळाचे प्रमाण कमी करून गहू वाढविण्यात आला आहे. पोषणमूल्य, उपलब्ध साठा आणि वितरण सुलभता या कारणांमुळे हा बदल करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली. यामुळे लाखो लाभार्थीना या सुधारित वाटपाचा लाभ मिळणार आहे.

(हेही वाचा – Thackeray Brothers Sabha : सत्ताधाऱ्यांपासून ते गौतम अदानींपर्यंत…, राज ठाकरेंची तोफ धडाडली)

लाभार्थीना पुरेसे व दर्जेदार धान्य मिळावे, हा यामागचा उद्देश आहे. गहू आणि तांदूळ यांचा पुरवठा नियमित राहील, असे अन्न व नागरी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. वेळेवर रेशनचे धान्य मिळणे महत्त्वाचे आहे. सणासुदीला आनंदाचा शिधा मिळण्याची गरज आहे. मात्र सध्या रेशन मिळत नाही, असे मत लाभार्थी संतोष घाणेकर यांनी व्यक्त केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.