-
ऋजुता लुकतुके
बीसीसीआयला नवीन धोरणानुसार, बेटिंग ॲप ड्रीम इलेव्हन कंपनीचं प्रायोजकत्व रद्द करावं लागलं आणि आयसीसीकडून मिळणाऱ्या महसूलातूनही यंदा घट झाली. तरीही आपला सगळ्यात श्रीमंत क्रिकेट मंडळ हा लौकिक बीसीसीआयने आरामात राखला आहे आणि आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ८,९६३ कोटी रुपयांची कमाईही केली आहे. सध्या हा कमाईचा अंदाज आहे आणि यात १,५०० कोटी रुपयांचं व्याजच समाविष्ट आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने बीसीसीआयनेच ही आकडेवारी जाहीर केली आहे. (BCCI Earning)
(हेही वाचा – New Year 2026 : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन आघात ३.०’; दिल्ली पोलिसांच्या कारवाईला वेग)
बीसीसीआयला आयसीसीकडून ३८.५ टक्के वाटा मिळतो. या वर्षी आयसीसी स्पर्धांमधून कमी महसूल आल्यामुळे एकूण उत्पन्न मागील वर्षापेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे, परंतु बीसीसीआयने ते संतुलित केले आहे. ड्रीम-११ बाहेर पडल्यानंतर, बीसीसीआयने ॲडिडाससोबत उच्च मूल्यांकनात जर्सी प्रायोजकत्व करार केला आहे. अपोलो टायर्ससोबतही स्वतंत्र करार झाला. ड्रीम इलेव्हनचा करार रद्द झाला असला तरी पुढील अडीच वर्षांसाठी बीसीसीआयने नवीन करार प्रत्यक्षात आणले आहेत. (BCCI Earning)
(हेही वाचा – पुण्यात लग्नाचा Fastest divorce! २४ तासांत डॉक्टर जोडपं झालं वेगळं; नक्की काय बिनसलं?)
आर्थिक वर्ष २०२४ -२५ मध्ये, बीसीसीआयचा सामान्य निधी ७,९९८ कोटींवरून वाढून ११,३४६ कोटींवर गेला आहे. तर अतिरिक्त निधी ३,३५८ कोटी राहिला. बीसीसीआयचं उत्पन्न आयपीएलमधील प्रायोजकत्व, आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आयसीसीकडून मिळणारा महसूलातील वाटा आणि देशांतर्गत सामन्यातून होणारं उत्पन्न यावर अवलंबून आहे. (BCCI Earning)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

