Accident News: दरीत बस कोसळून 9 जणांचा मृत्यू; राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

Accident News: दरीत बस कोसळून 9 जणांचा मृत्यू; राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

146
Accident News: दरीत बस कोसळून 9 जणांचा मृत्यू; राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
Accident News: दरीत बस कोसळून 9 जणांचा मृत्यू; राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

 

आंध्रप्रदेशच्या (Accident News) अल्लूरी सीताराम राजू (एएसआर) जिल्ह्यात मोठा अपघात घडला आहे. चिंतूरू आणि भद्राचलम यांच्या दरम्यान घाट रोडवर एक बस दरीत कोसळली. या भीषण अपघातात किमान 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना आज, शुक्रवारी सकाळी झाल्याचे सांगितले जात आहे. (Accident News)

हेही वाचा-Nagpur Leopard: नागपूरच्या वाडीमध्ये बिबट्याचा उच्छाद; गाव प्रशासनाकडून दवंडी, संध्याकाळी ६ नंतर दार बंद

अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्याचे कलेक्टर दिनेश कुमार यांनी सांगितले की , या अपघातात (Accident News) अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी भद्राचलम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी अनेकांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. तसेच मृतांची ओळख पटविण्याचे कामही सुरू आहे. (Accident News)

हेही वाचा- स्वाभिमानी पत्नीचा आदर्श! पोटगी तर नाकारलीच, पण सासूचे ‘गिफ्ट’ देखील केले परत ; Supreme Court कडून भरभरून कौतुक

या अपघाताबद्दल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू म्हणाले की, चित्तूर जिल्ह्यातील अल्लूरी सीताराम राजू परिसरात प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसचा झालेला हा अपघात अत्यंत धक्कादायक आहे. या अपघातात गेलेल्या जीवांबद्दल मला अतिशय दुःख झाले आहे. मी अधिकाऱ्यांशी बोलून परिस्थितीची आणि दिल्या जात असलेल्या मदतीची माहिती घेतली आहे. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकार अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Accident News)

हेही वाचा- Ind vs SA, T-20 Series : चंदीगड स्टेडिअमवर युवराज सिंह, हरमनप्रीत यांच्या नावाचे स्टँड

या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या विधानात म्हटले आहे, “अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यातील बस अपघातात मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना पीडित कुटुंबांसोबत आहेत. जखमी लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना करतो.” तसेच पीएमएनआरएफतर्फे मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. (Accident News)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही शोक व्यक्त केला. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, “आंध्र प्रदेशातील अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यात झालेल्या या दुर्दैवी बस दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे समजून अत्यंत दुःख झाले. मी शोकाकुल कुटुंबियांसोबत मनःपूर्वक संवेदना व्यक्त करते आणि जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करते.” (Accident News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.