साक्षी कार्लेकर
गलेलठ्ठ मूल म्हणजे सुदृढ (World Diabetes Day) आणि शरीरयष्टी कमी असलेले मूल म्हणजे अशक्त असा साधारण समज आहे. मात्र पालकांनो सावधान! हा गलेलठ्ठपणा बालकांमधील डायबेटिसही असू शकतो. मात्र या डायबेटिसवर आहार आणि जीवनशैलीत बदल करून नियंत्रण मिळवता येते. बदलती जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे जगभरात मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत. या आजाराबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी १४ नोव्हेंबरला ‘जागतिक मधुमेह दिन’ (World Diabetes Day) साजरा केला जातो. भारतात मधुमेहाचे रूग्ण सतत वाढत आहेत. इंटरनॅशनल डायबिटिस फेडरेशनच्या अहवालानुसार, २० ते ८० या वयोगटातील मधुमेहाच्या रुग्णांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. (World Diabetes Day)
मधुमेहाचा आजार हा केवळ वृद्ध व्यक्तीनांच होतो, असे पूर्वी म्हटले जायचे. मात्र आता लहान मुलंही या आजाराला बळी पडू लागली आहेत. हाती आलेल्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये दररोज ६५ मुलांना मधुमेह होतो आणि ही एक अतिशय गंभीर बाब आहे. भारतामध्ये नव्हेतर संपूर्ण जगामध्ये टाईप १ मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये धोक्याची घंटा म्हणजे यासंख्येमध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे. संपूर्ण जगामध्ये १२.११ लाखांहून अधिक लहान मुले आणि तरुण मुले-मुली टाइप १ मधुमेहाने ग्रस्त आहेत. १२.११ लाखांमध्ये निम्म्याहून अधिक मुलेही १५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. भारतात २.२९ लाखांहून अधिक मुले आणि तरुण टाइप १ मधुमेहग्रस्त आहेत. (World Diabetes Day)
मधुमेहाचे दोन प्रकार
डॉ. अक्षय छल्लाणी सांगतात की, टाइप १ आणि टाइप २. टाइप १ मधुमेह लहान मुलांना होतो. या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला जगण्यासाठी इन्सुलिनचे इंजेक्शन आवश्यक असते. वारंवार लघवीला जाणे, वजन झपाट्याने कमी होणे, तहान लागणे हे प्रकार टाइप १ मधुमेहाची आहेत. टाइप २ ने ग्रस्त लोकांवर औषधे आणि थेरपीद्वारे उपचार केले जाऊ शकतात; परंतु त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन देखील आवश्यक आहे. याव्यतिरिक्त लक्षणांमध्ये जास्त लघवी (पॉल्युरिया), वाढलेली भूक (पॉलीफॅगिया), जास्त तहान (पॉलीडिप्सिया) आणि लक्षणीय वजन कमी होणे यांचादेखील समावेश असू शकतो. (World Diabetes Day)
पूर्वीचे राहणीमान आपण लक्षात घेतले, तर आपल्याला समजेल की, मूलं शाळेतून घरी आली की, दप्तर टाकायचे आणि खेळायला जायचे. यामुळे त्यांच्या शरीराचा व्यायाम व्हायचा. त्यांना भूक लागायची. ही पद्धतच आता राहिलेली नाही. मुलगा सकाळी उठतो क्लासला जातो. शाळेतून येतो पुन्हा क्लासला जातो. त्यातून व्यायाम बंद झाला. पालकांच्या अपेक्षा आणि त्यातून अभ्यासाचा तणाव यांमुळे तो कधी झोपी जातो, त्यालाच कळत नाही. त्याचबरोबर बेकरी पदार्थ आणि पिझ्झा, बर्गर, सँडविच, खाण्याचे प्रमाण वाढले आहे. मर्यादित कुटुंब व्यवस्था, आई-वडील दोघेही नोकरीला, त्यातून लहान वयातच मुलांच्या हाती मोबाईल आला. कोविडमध्ये मोबाईल सक्तीचा झाला, आता तो काढूनही घेता येत नाही, अशी स्थिती आहे. घरी जेवण करायचा कंटाळा. सकस व समतोल आहारच मुलांतील डायबेटिस रोखू शकेल. त्या आहारात वरण-भात, पोळी, कोशिंबिर, उसळ, तूप यांचा समावेश असावा. मुलाला उत्तम प्रतीचे कार्बोहायड्रेटस, प्रथिने व फॅट्स मिळतील, असा आहार द्यावा. हा सगळा आहार घेतल्यानंतर तो पचन होण्यासाठी व्यायामाची गरज आहे. मुलांना खुल्या वातावरणात खेळायला पाठवावे. ही जर बांधणी व्यवस्थित झाली, तर मुलांची वाढ व्यवस्थित होईल. त्यातून डायबेटिससारख्या आयुष्यभर जडणाऱ्या आजारांपासून ते मूलं दूर राहील. (World Diabetes Day)
लहान मुलांमधील मधुमेह टाळण्याचे उपाय
- लहान मुलांना केक, बिस्किट, थंड पेय देणे टाळा. त्याऐवजी नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेली फळे द्या. उदाहरणार्थ, खजूर, केळी, द्राक्ष, लिची. या फळांमधून तुमच्या शरीरात साखर तर जाईलच; पण त्याचबरोबर शरीराला फायबरही मिळेल. (World Diabetes Day)
- दर दोन तासांनी त्यांना खायला द्या. लक्षात ठेवा यामध्ये त्यांना प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ न देता घरी तयार केलेले पदार्थ खाऊ घाला. यात इडली, ढोकळा, दही आदी आंबवलेल्या पदार्थांचा समावेश करा. यामुळे गुड बॅक्टेरिया वाढतील आणि त्याचा फायदा तुमच्या लहानग्यांच्या शरीराला मिळेल. तसेच खाद्यपदार्थांचे पचन व्यवस्थित होईल, यकृतावर येणारा ताण कमी होईल. (World Diabetes Day)
- प्रोटीन्स, ओमेगा-३ असलेले अन्नपदार्थ मुलांना जास्तीतजास्त देण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मुलांच्या शरीरातून विषारी घटकांचा निचरा होईल. (World Diabetes Day)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community

