BMC Election : पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा ‘मास्टरप्लॅन’ ! हजारो नियुक्त्या, ठाकरेंना देणार मोठा धक्का ?

172
BMC Election : पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा ‘मास्टरप्लॅन’ ! हजारो नियुक्त्या, ठाकरेंना देणार मोठा धक्का ?
  • प्रतिनिधी 

मुंबई महापालिका निवडणुका जवळ येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने शहरात गुप्त तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या अंतर्गत हालचालींनी आता विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (BMC Election)

विश्वसनीय सूत्रांनुसार, शिवसेनेने शहरातील प्रत्येक विभागात ‘मायक्रो प्लानिंग’ मोड सुरु केला आहे. निवडणुकीपूर्वीच घराघरांत पोहोचून मतदारांचा थेट संपर्क वाढवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर नव्या जबाबदाऱ्या वाटप करत संघटनशक्ती वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. (BMC Election)

(हेही वाचा – ‘वंदे मातरम’ला विरोध करणाऱ्या आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; मंत्री Mangal Prabhat Lodha यांची मागणी)

याचसोबत काही दिवसांपूर्वी विभागप्रमुखांच्या नियुक्तीवरून निर्माण झालेल्या नाराजीला शिवसेनेने कुशलतेने हाताळले आहे. नाराज कार्यकर्त्यांना ‘विभाग समन्वयक’ आणि ‘शाखा समन्वयक’ पदे देत त्यांची समजूत काढण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत तब्बल अडीच ते तीन हजार नियुक्त्या झाल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. (BMC Election)

दरम्यान, मुंबईतील एकूण २२७ वॉर्डांपैकी तब्बल ८० टक्के वॉर्डांमध्ये गटप्रमुखांची नेमणूक पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. मतदार यादीतील प्रत्येक नाव पडताळण्यासाठी ‘शिवदूत’ आणि ‘लक्षवेध’ या ॲपच्या माध्यमातून डिजिटल मोहीमही सुरू झाली आहे. (BMC Election)

(हेही वाचा – Chhath Puja विषयी अवमानकारक वक्तव्य; राहुल गांधींविरुद्ध मुझफ्फरपूर न्यायालयात तक्रार दाखल)

ज्या वॉर्डांमध्ये पक्षाचे वर्चस्व कमी आहे, तिथे वातावरण बदलण्यासाठी खास धोरण आखण्यात आले आहे. राज्याच्या सर्वात प्रतिष्ठेच्या मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंना जोरदार धक्का देण्यासाठी शिवसेनेने ‘ग्राऊंड वर्क’ला वेग दिला आहे, अशी माहिती पक्षातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. (BMC Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.