-
प्रतिनिधी
मराठवाड्यातील तुळजापूरचा (Tuljapur) नवरात्रोत्सव म्हणजे भाविकांची लाखोंची गर्दी, यात्रेतील उत्साह आणि व्यापाराला चालना देणारे पर्व. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी दिसून आली. गेल्या काही दिवसांत झालेल्या महापुरामुळे यात्रेच्या वातावरणावर थेट परिणाम झाला आहे. मंदिर परिसरात भाविकांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याने यंदाचा उत्सव उत्साहाऐवजी चिंतेचं कारण ठरला आहे.
(हेही वाचा – Asia Cup : आशिया चषकाचे हीरो जेव्हा मायदेशी परतले; गंभीर थेट अहमदाबादमध्ये दाखल, सूर्यकुमारचं मुंबईत जंगी स्वागत)
यात्रेत भाविकांची कमी उपस्थिती दिसून आल्याने मंदिर परिसरात सगळीकडे सुनसान चित्र पाहायला मिळालं. यात्रेवर अवलंबून असलेल्या व्यापाऱ्यांना या घडामोडींनी जबरदस्त फटका बसला आहे. रोजच्या रोज लाखोंचा उलाढाल करणाऱ्या बाजारात यावेळी माल तसाच पडून राहिला. छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना अपेक्षित कमाई न झाल्याने कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Tuljapur)
(हेही वाचा – Philippines Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने फिलीपिन्स हादरलं! ६० जणांचा मृत्यू)
गेल्या वर्षी यात्रेदरम्यान साडेसहाशे क्विंटल कुंकवाची विक्री झाली होती. भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे व्यापाऱ्यांना सोन्याचा हंगाम मिळाला होता. पण यंदा चित्र पूर्णपणे उलट आहे. यावर्षी फक्त सव्वाशे क्विंटल कुंकवाचं विक्री झाली, म्हणजे तब्बल चारशे क्विंटलपेक्षा जास्त विक्री घटली आहे. यात्रेसाठी व्यापाऱ्यांनी आणलेला मोठा माल तसाच पडून राहिला आहे. या परिस्थितीमुळे तुळजापुरातील अकराशे व्यापारी कुटुंबांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरं जावं लागलं आहे. महापुराच्या सावटामुळे उत्सवाच्या रंगतिला ओहोटी लागली आणि व्यापाऱ्यांच्या हातचं पिकलेलं फळ गळून पडलं! (Tuljapur)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

