-
प्रतिनिधी
नवरात्रोत्सवाची धूम सुरु आहे, पण यंदा झेंडूच्या फुलांवर सणाचा रंग कमी दिसतोय. महाराष्ट्रातल्या अनियमित पावसामुळे झेंडूची फुले कुजली, दर्जा गेला आणि बाजारात मागणीही कमी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली होती. (Rain News)
गेल्या आठवड्यात झेंडूचा भाव फक्त ३० ते ४० रुपये प्रति किलो होता, ज्यामुळे शेतकऱ्यांचा सणासुदीचा उत्साह दबला. ग्राहक देखील खराब दर्जाच्या फुलांमुळे खरेदीसाठी येत नव्हते. काही शेतकऱ्यांनी जिद्द दाखवत कष्टाने चांगले पीक उभे केले, पण भावाच्या कमतरतेमुळे चिंता कायम होती. (Rain News)
(हेही वाचा – Gold In Indian Houses : भारतीय घरांमध्ये असलेलं सोनं, अमेरिका, चीन आणि रिझर्व्ह बँकेपेक्षाही जास्त)
पण आता परिस्थितीत बदल दिसतोय. बाजारात झेंडूला ८०-९० रुपयांचा भाव मिळू लागला असून, दसऱ्याच्या दिवशी हा भाव शंभरी पार करून १००-१५० रुपयांपर्यंत जाऊ शकतो, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे. घाऊक व्यापारी आतापासूनच शेतकऱ्यांशी संपर्क साधून फुले खरेदीसाठी सज्ज झाले आहेत. यंदा झेंडूच्या या अचानक वाढलेल्या भावामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण तयार झाले आहे. (Rain News)
अर्थात, पावसाने नुकसान केले तरी शेतकऱ्यांनी मेहनतीतून झेंडूचे पीक उभे केले, आणि दसऱ्याला झेंडूला सोनेरी भाव मिळण्याची शक्यता आहे. यंदा बळीराजाला दोन पैसे हातात येण्याची संधी आहे! (Rain News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

