BMC Hospital : आधी औषध खरेदीत विलंब; आता अंमलबजावणीत उशीर

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील मोफत औषधांचा पुरवठा करण्यासाठी मागील २०२२ पासून रखडलेली औषध खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी तर मिळाली, पण प्रत्यक्षात ही औषधे काही महापलिकेच्या रुग्णालयांमध्ये न पोहोचल्याने रुग्णांच्या हाती डॉक्टरांच्या चिठ्या पडून त्यांना खासगी रुग्णालयातूनच औषधे आणण्याची वेळ येत आहे.

461
BMC Hospital : आधी औषध खरेदीत विलंब; आता अंमलबजावणीत उशीर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील (BMC Hospital) मोफत औषधांचा पुरवठा करण्यासाठी मागील २०२२ पासून रखडलेली औषध खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी तर मिळाली, पण प्रत्यक्षात ही औषधे काही महापलिकेच्या रुग्णालयांमध्ये न पोहोचल्याने रुग्णांच्या हाती डॉक्टरांच्या चिठ्या पडून त्यांना खासगी रुग्णालयातूनच औषधे आणण्याची वेळ येत आहे. जून महिन्यात या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर जुलै महिन्यापासून ही औषधे मिळणे आवश्यक होते. परंतु सप्टेंबर निम्मा उलटत आला तरी मंजूर केलेली औषधेही रुग्णालयांमध्ये पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे या औषधे खरेदीची निविदा काढण्यात विलंब झाला आणि आता याला मंजुरी मिळाल्यानंतर याला विलंब होत असल्याने महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये झिरो प्रिक्रिप्शन ऐवजी प्रिक्रिप्शनद्वारेच औषध आणण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर आली आहे. (BMC Hospital)

मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह (BMC Hospital) विशेष आणि उपनगरीय रुग्णालये आणि दवाखाने, आरोग्य केंद्र आणि प्रसुतीगृहांमधील रुग्णांना महापालिकेच्या अनुसुचीवर औषधे मोफत पुरवठा करण्यात येत असतात. परंतु मागील २०२२मध्ये औषधांच्या पुरवठ्याचे कंत्राट रद्द झाल्यानंतर याची प्रक्रिया रखडली होती. त्यातच झिरो प्रिक्रिप्शनच्या नावावर अनुसूची सुधारित करून सर्व प्रकारच्या औषधांची सुधारित यादी करण्यात आली आहे. त्यामुळे अनुसूचीवरील सुधारित यादीनुसार सुमारे २ हजार कोटींची औषधांची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु होती. परंतु याला यश न आल्याने महापालिकेने आता १२ अनूसूचीवर जुन्याच यादीनुसार आवश्यकतेनुसार औषधांची खरेदी करण्यासाठी निविदा मागवली. ही निविदा अंतिम करून याला महापालिकेची मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यानुसार तब्बल ११०० ते १२०० कोटी रुपयांची औषध आणि वैद्यकीय साहित्यांच्या खरेदीची प्रक्रिया राबवली जात आहे. (BMC Hospital)

(हेही वाचा – Asia Cup 2025 : ‘या’ विक्रमात अभिषेक शर्माची रोहित शर्माशी बरोबरी)

सन २०२२ मध्ये औषधांच्या पुरवठ्यासाठी नेमलेल्या कंपन्यांची मुदत संपुष्टात आल्यानंतर त्यांना याचा पुरवठा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती, आणि त्यानंतर स्थानिक पातळीवर या औषधांची खरेदी करण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये (BMC Hospital) औषधांची खरेदी केली जात होती. परंतु औषध खरेदीच्या प्रस्तावाला जून २०२५ रोजी मंजुरी मिळाल्याने पुढील महिन्यात म्हणजे जुलैपासून ही औषधे महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध होतील, असा अंदाज होता. त्यामुळे रुग्णालयांमध्ये औषधांची कमतरता भासणार नाही, असेही बोलले जात होते. (BMC Hospital)

मंजुरी दिलेल्या औषधांच्या प्रस्तावांमध्ये टॅबलेट्स आणि कॅप्सुल (१३५.५० कोटी रुपये), लेबोरटली आर्टीकल्स, दवाखाना साहित्य (५६ कोटी रुपये), इंजेक्शन आणि सेरा (३०१.५० कोटी रुपये), निडल्स आणि सिरीजेस (४५ कोटी), लिक्विड मेडिकल (७९.८६ कोटी रुपये), रबर गुड्स (६४.०८ कोटी रुपये), अनुसूची सात वरील ९४ औषधांची खरेदी (११०.४२ कोटी रुपये), एक्स रे फिल्म, केमिकल्स इसिजी (५३.८० कोटी रुपये), अनुसूची पाचवरील ५७ बाबींची खरेदी (३०.३० कोटी रुपये), अनुसूची ३वरील ३०१ बाबीची खरेदी (४६.०४ कोटी रुपये), लेबोटरी केमिकल्स स्टेन अँड रिएंट सोल्यूशन (३५.७५ कोटी रुपये) आदींचा समावेश असून तब्बल ११०० ते १२०० कोटींची औषध खरेदीला मान्यता देण्यात आली होती. (BMC Hospital)

(हेही वाचा – Maharashtra Ecosystem : राज्यात गुंतवणूकदारांसाठी नवे युग सुरू होणार; काय आहे शासनाचा मास्टरप्लॅन)

परंतु, या औषधे तसेच साहित्यांच्या खरेदीला मान्यता दिल्यानंतरही ही औषधे रुग्णालयांमध्ये (BMC Hospital) पोहोचली नसून याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता प्रस्ताव मंजुरीनंतर औषध वितरकांना कार्यादेश न दिल्याने ते पुरवठा करू शकत नाही. वितरकांवर औषधे कंपनी आणि त्यांच्या संचालकांच्या स्वाक्षरीसह अनेक पानांचे रेट कॉन्ट्रक्ट करण्याची सक्ती केली आहे आणि यामुळे वितरकांवर अशाप्रकारे सक्ती केली जात असल्याने याला विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, कंत्राटदाराने रेट कॉन्ट्रक्टचा मसुदा स्वाक्षरी करून दिल्यानंतर त्यांना कार्यादेश दिला जातो आणि आतापर्यंत दहा ते बारा जणांना अशाप्रकारचे कार्यादेश देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र, असे जरी असले तरी रुग्णांना वेळेवर औषधे उपलब्ध व्हावी ही प्राथमिकता असण्याऐवजी रुग्णांची गैरसोय कशाप्रकारे होईल यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केला जात असल्याने महापालिकेच्या रुग्णालयंमध्ये औषध पुरवठा करण्याच्या प्रक्रियेत सुसुत्रता आणणे आवश्यक असून जे कोविडमध्ये झाले ते या औषध खरेदीत होऊ नये याची भीती अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. (BMC Hospital)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.