-
प्रतिनिधी
महाराष्ट्रातील पोलीस दलात तब्बल १५ हजार पदांची महाभरती होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी या योजनेला हिरवा कंदील मिळाला. राज्यभरातील तरुणांसाठी ही संधी सुवर्णअवसर ठरणार आहे. (Cabinet Decision)
(हेही वाचा – Dahisar Toll Naka : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दहिसर टोल हटवणार?; शिंदेंसमोर टोल प्रश्न)
भरतीमध्ये पोलीस शिपाई – १०,९०८, चालक – २३४, बॅण्डस् मॅन – २५, सशस्त्री शिपाई – २,३९३, आणि कारागृह शिपाई – ५५४ अशी पदे भरण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे, तर २०२२ आणि २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एकदा विशेष संधी दिली जाणार आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी लेखी परीक्षा ओएमआर प्रणालीद्वारे होणार असून, सर्व टप्प्यांचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडे असतील. (Cabinet Decision)
उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार, पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही भरती निर्णायक ठरणार आहे. आता फक्त राज्यातील हजारो तरुणांची नजर भरती जाहिरातीच्या अधिकृत घोषणेवर खिळली आहे… कारण पुढचा टप्पा ठरवणार त्यांचं भविष्य! (Cabinet Decision)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

