-
ऋजुता लुकतुके
मँचेस्टर कसोटीच्या पहिल्याच दिवशी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) झालेल्या दुखापतीमुळे तो उर्वरित मालिका खेळू शकणार नाहीए. बीसीसीआयने (BCCI) अधिकृत घोषणा केली नसली तरी तामिळनाडूचा यष्टीरक्षक फलंदाज नारायण जगदीशनची (Narayan Jagadeesan) बदली खेळाडू म्हणून निवड झाली आहे. त्याला चार दिवसांपूर्वीच युकेसाठीच्या व्हिसाची तयारी करण्यास सांगण्यात आलं होतं. त्याला आता व्हिसा मिळाला असून रविवारी तो लंडनसाठी रवानाही झाला आहे. (Ind vs Eng, 4th Test)
त्यामुळे मँचेस्टरमधून भारतीय संघ लंडनला परतेल, तेव्हा जगदिशन संघाच्या ताफ्यात शामील होईल. मँचेस्टरमध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) फलंदाजी तर करतोय. पण, यष्टीरक्षणाची जबाबदारी तो पार पाडू शकणार नाही. आणि ही कसोटी संपल्यावर तो थेट बंगळुरूला रवाना होणार आहे. तिथे त्याच्या दुखऱ्या पायावर उपचार करण्यात येतील. तो ६ ते ८ आठवडे क्रिकेटपासून दूर असेल. पंतच्या अनुपस्थितीत निवड समितीने ईशान किशनचाही विचार केला होता. पण, त्याचाही एका रस्ते अपघातात पाय दुखावला आहे. आणि त्याच्या उजव्या पायाच्या धोट्याला टाके पडले आहेत. त्यामुळे तो निवडीसाठी उपलब्ध नव्हता. त्यानंतर मग निवड समितीने एन जगदिशनला व्हिसाची तयारी करण्यासाठी सांगितलं. (Ind vs Eng, 4th Test)
(हेही वाचा – Yavatmal मध्ये धक्कादायक घटना; घराभोवती ‘करंट’ देऊन कुटुंबाला संपवण्याचा कट)
आयपीएलमध्ये जगदीशन (Narayan Jagadeesan) चमकला नसला तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो अनुभवी खेळाडू आहे. आणि तामिळनाडूसाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून भूमिका वठवताना त्याने ५२ प्रथमश्रेणी सामन्यांत ३,३७३ धावा केल्या आहेत. त्याची सरासरीही ४७.५० अशी तगडी आहे. त्याच्या नावावर १० शतकं आणि १४ अर्धशतकं आहेत. मागच्या रणजी हंगामात तर जगदीशन तामिळनाडूसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. या हंगामात त्याने ८ सामन्यांत ५६.१६ धावांच्या सरासरीने ६७४ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर दोन शतकं आणि ४ अर्धशतकं आहेत. (Ind vs Eng, 4th Test)
देशांतर्गत क्रिकेटचा विचार केला तर विदर्भाच्या अक्षय वाडकरनेच फक्त जगदीशनपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. भारताचा आणखी एक यष्टीरक्षक के एस भारतही (Srikar Bharat) सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळतोय. पण, निवड समितीने देशांतर्गत धावा करणाऱ्या जगदीशनला पसंती दिली आहे. जगदीशन वेळेत इंग्लंडला पोहोचला तर पाचव्या ओव्हल कसोटीत तो खेळण्याचीही शक्यता आहे. सध्या भारताकडे यष्टीरक्षणासाठी ध्रुव जुरेल (Dhruva Jurel) आणि के एल राहुल (KL Rahul) हे पर्यायही आहेत. पण, ज्या गतीने जगदीशनला इंग्लंडमध्ये आणण्याच्या हालचाली सुरू आहेत, ते पाहता तो खेळण्याचीही दाट शक्यता आहे. (Ind vs Eng, 4th Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

