Shirdi Police Station : ऑनलाइन घेतली दीड कोटींची लाच; पीएसआयसह चौघांवर निलंबनाची कारवाई

3303
ऑनलाइन घेतली दीड कोटींची लाच, पीएसआय सह चौघांवर निलंबनाची कारवाई मुंबई- शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली.अहिल्यानगर (अहमदनगर) पोलीस दलाच्या गुन्हे शाखेच्या एका पोलीस उपनिरीक्षक आणि तीन शिपायांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी दीड कोटींची लाच ऑनलाइन घेतल्याचे समोर आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या ऑनलाइन लाचखोरीची पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेत पोलीस उपनिरीक्षकासह चौघांना निलंबित करून त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशीचा फास आवळण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात शेअर मार्केट घोटाळा प्रकरणात शिर्डी पोलीस ठाण्यात ६ जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी भुपेंद्र सावळे याला या प्रकरणात अटक करण्यात आली होती, गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याकारणाने हा गुन्हा स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी युवराज आथरे या गुन्हयाचा तपास करीत होते.आरोपी भुपेंद्र सावळे याला अटक करण्यात आल्यानंतर आरोपीचे बँक खाते तपासत असताना अधिकाऱ्यां ना दीड कोटींचा ऑनलाइन व्यवहार आढळुन आला, या ऑनलाइन व्यवहाराची चौकशी करीत असतांना दीड कोटींची रकम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्या खात्यावर गेल्याचे समोर आले. आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी भुपेंद्र सावळे याच्याकडे चौकशी केली असता त्याने कबूल केले की दीड कोटींची रक्कम पोलीस उपनिरीक्षक धाकराव यांना जानेवारी महिण्यात ऑनलाइन पाठविण्यात आले, ही रक्कम गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याना देण्यात आली होती.माहिती विचारली असता सावळे त्यांनी सांगितले की, १५ जानेवारी २०२५ रोजी मला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, व त्यांच्या सोबत असलेले तिनं कर्मचारी यांनी मी व माझे दोन भाउ आणि मित्र असे सर्व जण नाशिक कडे जात असताना लोणी गावाजवळ आम्हाला अडवून धाकराव साहेब मला म्हणाले की तुझ्या कडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे कोणत्याही प्रकारचे लायसन्स नसताना जनतेकडून पैसा गोळा करून जनतेची फसवणूक करतो म्हणून तुझ्यावरच गुन्हा दाखल करतो. मी त्यांना म्हणालो की साहेब माझ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करु नका.मी कोणाचीही फसवणूक केली नाही. मला विनाकारण कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकवू नका त्यावर ते व त्यांच्या सोबत असलेले तिनं पोलिस कर्मचारी म्हणाले की "तुला जर या गुन्ह्यातून सही सलामत सुटायचे असेल तर तु आम्हाला दीड कोटी रुपये दे "त्यावर मी धाकराव साहेब व त्यांच्या सोबत असलेल्या तिनं पोलिस कर्मचाऱ्यांना म्हणालो की माझ्याकडे रोख स्वरुपात पैसे नाहीत तर धाकराव साहेब व त्यांच्या सोबत असलेल्या तिनं कर्मचाऱ्यांनी मी माझे दोन भाऊ व मित्र या सर्वांना अहिल्यानगर येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील पार्किंग मध्ये घेऊन आले. तेथे थांबल्यावर धाकराव साहेबांनी दीड कोटी रुपये द्या असे सांगितले. खोट्या गुन्ह्यात अडकण्या पेक्षा पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव साहेबांनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी दिलेल्या खात्यावर मी ऑनलाईन पद्धतीने दीड कोटी रुपये ट्रान्स्फर केले अशी आरोपीनी माहिती दिली. या प्रकरणाची दखल खुद्द पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घेऊन तात्काळ पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव आणि तीन पोलीस कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी हिंदुस्थान पोस्ट शी बोलताना सांगितले.
  • प्रतिनिधी 

शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली. अहिल्यानगर (अहमदनगर) पोलीस दलाच्या गुन्हे शाखेच्या एका पोलीस उपनिरीक्षक आणि तीन शिपायांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी दीड कोटींची लाच ऑनलाइन घेतल्याचे समोर आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या ऑनलाइन लाचखोरीची पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेत पोलीस उपनिरीक्षकासह चौघांना निलंबित करून त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशीचा फास आवळण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. (Shirdi Police Station)

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात शेअर मार्केट घोटाळा प्रकरणात शिर्डी पोलीस ठाण्यात ६ जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी भुपेंद्र सावळे याला या प्रकरणात अटक करण्यात आली होती, गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याकारणाने हा गुन्हा स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी युवराज आथरे या गुन्ह्याचा तपास करीत होते. आरोपी भुपेंद्र सावळे याला अटक करण्यात आल्यानंतर आरोपीचे बँक खाते तपासत असताना अधिकाऱ्यांना दीड कोटींचा ऑनलाइन व्यवहार आढळुन आला, या ऑनलाइन व्यवहाराची चौकशी करीत असतांना दीड कोटींची रकम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्या खात्यावर गेल्याचे समोर आले. (Shirdi Police Station)

(हेही वाचा – China कडून भारताविरोधात कुरापत्या सुरूच; सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार)

आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी भुपेंद्र सावळे याच्याकडे चौकशी केली असता त्याने कबूल केले की, दीड कोटींची रक्कम पोलीस उपनिरीक्षक धाकराव यांना जानेवारी महिण्यात ऑनलाइन पाठविण्यात आले. ही रक्कम गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याना देण्यात आली होती. माहिती विचारली असता सावळे त्यांनी सांगितले की, १५ जानेवारी २०२५ रोजी मला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव व त्यांच्यासोबत असलेल्या तीन कर्मचारी मी व माझे दोन भाऊ आणि मित्र असे सर्व जण नाशिककडे जात असताना लोणी गावाजवळ आम्हाला अडवून धाकराव साहेब मला म्हणाले की, तुझ्याकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे कोणत्याही प्रकारचे लायसन्स नसताना जनतेकडून पैसा गोळा करून जनतेची फसवणूक करतो म्हणून तुझ्यावरच गुन्हा दाखल करतो. (Shirdi Police Station)

मी त्यांना म्हणालो की, साहेब माझ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करु नका. मी कोणाचीही फसवणूक केली नाही. मला विनाकारण कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकवू नका त्यावर ते व त्यांच्या सोबत असलेले तिनं पोलिस कर्मचारी म्हणाले की, “तुला जर या गुन्ह्यातून सही सलामत सुटायचे असेल तर तु आम्हाला दीड कोटी रुपये दे “त्यावर मी धाकराव साहेब व त्यांच्या सोबत असलेल्या तिनं पोलिस कर्मचाऱ्यांना म्हणालो की माझ्याकडे रोख स्वरुपात पैसे नाहीत तर धाकराव साहेब व त्यांच्या सोबत असलेल्या तिनं कर्मचाऱ्यांनी मी माझे दोन भाऊ व मित्र या सर्वांना अहिल्यानगर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पार्किंग मध्ये घेऊन आले.

तेथे थांबल्यावर धाकराव साहेबांनी दीड कोटी रुपये द्या असे सांगितले. खोट्या गुन्ह्यात अडकण्या पेक्षा पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या खात्यावर मी ऑनलाईन पद्धतीने दीड कोटी रुपये ट्रान्स्फर केले अशी आरोपीनी माहिती दिली. या प्रकरणाची दखल खुद्द पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घेऊन तात्काळ पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव आणि तीन पोलीस कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले. (Shirdi Police Station)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.