BMC : अरुंद गल्ल्या आणि फेरीवाल्यांबाबत महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला आदेश; म्हणाले…

2548
BMC : अरुंद गल्ल्या आणि फेरीवाल्यांबाबत महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला आदेश; म्हणाले...
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबईतील अरुंद परिसरात आग लागल्यास त्याठिकाणी अग्निशमन दलाच्या यंत्रणा पोहोचण्यात अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे स्पष्ट निर्देशच महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी बुधवारी भायखळा राणीबागेतील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले. एवढेच नाही तर वर्दळीची ठिकाणे, रेल्वे स्थानक परिसर हे फेरीवाला मुक्त करण्यासाठी संबंधित विभाग (वॉर्ड) वगळता इतर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने विशेष मोहीम राबवावी, जेणेकरुन तो विभाग फेरीवालामुक्त राहिल अशाप्रकारचेही निर्देश दिले असून आयुक्तांच्या आदेशानंतर प्रशासनातील निर्ढावलेले अधिकारी या कार्यवाहीसाठी किती प्रभावीपणे काम करतात याकडेच लक्ष राहणार आहे. (BMC)

मुंबईतील विविध योजना, प्रकल्प आदींची तयारी व उपाययोजना तसेच त्यातील अडचणी आदींबाबत महानगरपालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि वनस्पती उद्यान (भायखळा) येथे बुधवारी २३ जुलै २०२५ रोजी पार पडली. यावेळी गगराणी यांनी हे निर्देश दिले. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, सह आयुक्त (दक्षता) डॉ. गंगाधरण डी. यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. तसेच सह आयुक्त, उपायुक्त, संचालक, सहायक आयुक्त, विभाग प्रमुख, खाते प्रमुख आदी या बैठकीस उपस्थित होते. (BMC)

महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी, मुंबईत कोणत्याही बाबींसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी असतील तर त्यांना त्या तक्रारीची सद्यस्थिती सहज जाणून घेता येईल, अशी व्यवस्था असावी. तसेच, नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे, अशाप्रकारचेही निर्देश दिले. तसेच मुंबईतील सुलभ वाहतूक आणि नागरिकांच्या मार्गक्रमणात अडथळा निर्माण करणारी बेवारस वाहने आणि भंगार तथा टाकाऊ साहित्य तत्काळ हटवण्याचेही निर्देशही देण्यात आले आहेत. (BMC)

(हेही वाचा – Eng vs Ind Test Match : चौथ्या कसोटीआधीच एक मजेशीर आकडेवारी समोर; वाचा संपूर्ण बातमी)

वाहनतळासाठीच वापर होतो की नाही ते तपासणार

व्यावसायिक मार्गांच्या (कमर्शियल स्ट्रीट) ठिकाणी असलेल्या आस्थापनांना तळमजल्यात वाहनतळ परवाना देण्यात आला असूनही त्या जागेचा वापर इतर कारणांसाठी केला जात असल्याचे आढळून येत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अकस्मात भेटी देऊन तत्काळ आणि कठोर कारवाई करावी, असेही निर्देश भूषण गगराणी यांनी दिले आहेत. (BMC)

नव्याने बनवलेले रस्ते खोदता येणारच नाही

विभागातील महत्वपूर्ण उपक्रम, सद्यस्थिती आणि उपाययोजना आदींचा आढावा प्रत्येक विभाग तसेच खात्यांकडून घेण्यात आला. रस्त्यांची कामे झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव रस्ते नव्याने खोदले जाऊ नयेत. तसेच, रस्ते खोदण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी परवानगी देऊ नये. सध्या अस्तित्वात असलेले आणि उत्तम स्थितीत असलेले पदपथ तोडू नयेत तसेच यंदाच्या पावसाळ्यात पाणी साचण्याची काही ठिकाणे समोर आली आहेत. तसेच, पायाभूत सुविधांच्या कामकाजामुळे काही ठिकाणी पाणी साचत असल्याचे आढळून आले आहे. त्याठिकाणी त्वरित योग्य उपाययोजना कराव्यात, असेही निर्देश दिले आहेत. (BMC)

(हेही वाचा – Tansa Lake : मोडक सागर पाठोपाठ तानसा तलावाने ओलांडली पाण्याची पातळी)

स्वच्छतेमध्ये सहायक आयुक्तांची देखरेख हवीच

स्वच्छतेच्या बाबतीत सहायक आयुक्त स्तरावर अधिक प्रभावीपणे पर्यवेक्षण होणे गरजेचे आहे असे स्पष्ट करतानाच स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, शिक्षण आदी सेवा-सुविधांची पूर्तता ही महानगरपालिकेची प्रमुख जबाबदारी आहे. त्यामुळे या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यस्थळी पाहणी करून वेळोवेळी अंमलबजावणी करावी, असेही निर्देश या आढावा बैठकीत देण्यात आले आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.