Maharashtra Politics : महाराष्ट्रात ज्याच्यावर विधेयक आलं ती डावी-उजवी विचारसरणी जगात आली कुठून ?

Maharashtra Politics : महाराष्ट्रात ज्याच्यावर विधेयक आलं ती डावी-उजवी विचारसरणी जगात आली कुठून ?

153
Maharashtra Politics : महाराष्ट्रात ज्याच्यावर विधेयक आलं ती डावी-उजवी विचारसरणी जगात आली कुठून ?
Maharashtra Politics : महाराष्ट्रात ज्याच्यावर विधेयक आलं ती डावी-उजवी विचारसरणी जगात आली कुठून ?

महाराष्ट्र (Maharashtra Politics) विधानसभेने नुकताच जनसुरक्षा कायदा संमत केला. महाराष्ट्रातील अति कडव्या डाव्या विचारसरणीच्या विरोधात हा कायदा वापरण्यात येणार असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. यावरुन डाव्या विचारसरणीचे कोण? उजव्या विचार सरणीचे कोण? यावर लगेचच महाराष्ट्रात बराच खल सुरु झाला आहे. (Maharashtra Politics)

हेही वाचा-CBSE School: सीबीएसई बोर्डाचा नवा नियम! शाळांना रिअल-टाइम रेकॉर्डिंगसह सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश

या संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला तब्बल ३०० वर्षे मागे जावे लागेल. तेव्हा युरोपात फ्रेंच राज्यक्रांतीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली होती. युरोपातील सम्राटांच्या विशेषत: जुलमी सम्राटांच्या विरोधात लोकशाहीवादी लोकांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली होती. यामुळे समाजात सगळीकडे जागृतीचे वातावरण सुरु झाले होते. त्यावेळी फ्रान्समध्ये सर्व निर्णय घेण्यासाठी उमराव सभा अस्तित्त्वात होती. याच सभेत अगदी योगायोगाने एक घटना घडली. (Maharashtra Politics)

या सभेत जे उमराव सम्राटाच्या विचाराचे किंवा त्याच्या बाजूचे असतील ते सम्राटाच्या आसनाच्या उजव्या बाजूला तर विरोधक डाव्या बाजूला बसण्यास सुरुवात झाली. ही व्यवस्था तिथून पुढे रुढच झाली. पुढे सम्राटाच्या जुलमी राजवटीच्या विरोधात तयार झालेल्या विद्रोहाचे रुपांतर मोठ्या वावटळीत झाले आणि त्यातूनच जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी फ्रेंच राज्यक्रांती घडली. याच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मुल्य दिली तशीच ही उजवे – डावे ही विचारसरणीची विभागणीही दिली. तेव्हापासून राजेशाहीचे किंवा सत्तेचे, भांडवल शाहीचे, पारंपारिक विचारांचे प्रतिनिधित्व करणारे उजव्या विचारसरणीचे आणि त्याला विरोध करणारे डाव्या विचारसरणीचे असे मानले जाऊ लागले जगभर अशीच विभागणी होऊ लागली. (Maharashtra Politics)

हेही वाचा- आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार ; इराणचे परराष्ट्र मंत्री Abbas Araghchi यांची घोषणा

पुढे जेव्हा कार्ल मार्क्स आणि मायकेल एंजेल्स या दोघांनी भांडवलशाहीला विरोधात विचार मांडत कामगारांच्या बाजूने तत्त्वज्ञान सांगितले, त्या तत्वज्ञानाला कम्युनिझम म्हटले जाते. तेव्हापासून डाव्या विचारसरणीच्या लोकांना कम्युनिस्ट म्हणणे सुरु झाले. अशी ही विभागणी प्रत्येक देशात वेगळी आहे. जसे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प ज्या रिपब्लिकन पार्टीचे आहेत ती उजव्या विचारसरणीची तर डाव्या विचारसरणीचे डेमोक्रॅट्स मानले जातात. भारतात ज्यांना आपण राष्ट्रवादी विचारांचे म्हणतो त्यांना उजव्या विचारसरणीचे मानले जातात ज्यातील राजकीय पक्षांमध्ये भाजप, शिवसेना हे पक्ष येतात, तर डाव्या विचारसरणीसाठी कम्युनिस्ट पार्टी आणि काँग्रेस पक्ष मध्यममार्गी समजले जातात. (Maharashtra Politics)

या सध्याच्या कायद्याबद्दल बोलायचे झाल्यास हा कायदा अति कडव्या डाव्या विचारसरणींच्या संघटनांविरोधात आहे. ज्यांना आपल्याकडे सामान्यत: नक्षलवादी म्हटले जाते, ज्यांचा भारतीय संविधानावर, लोकशाहीवर विश्वास नाही आणि ती उलथवून टाकण्यासाठी ते काम करत आहेत अशांसाठी हा कायदा आहे. तर ही आहे या डाव्या – उजव्या विचारसरणींच्या उदयाची गोष्ट. (Maharashtra Politics)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.