
-
प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी येथील पॉवर स्टेशन प्रकल्पासाठी टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना मिळालेला मोबदला अत्यल्प असल्याच्या तक्रारींवर आता शासनाने लक्ष दिले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. (Tadali Power Station Project)
नेमकं प्रकरण काय?
ताडाळी येथील ६०० मेगावॅट क्षमतेच्या धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड पॉवर प्रकल्पासाठी वर्धा नदीतून १८.२७ दलघमी पाणी उचलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, कंपनीने पाईपलाईन मंजूर मार्गाने न टाकता शेतजमिनीतून पाईपलाईन टाकली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. (Tadali Power Station Project)
(हेही वाचा – ड्रग्ज माफियांना धडा शिकवणार ‘मकोका’ सुधारणा; गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांनी सादर केले विधेयक)
काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन?
“या प्रकरणी जिल्हाधिकारी चंद्रपूर कार्यालयाकडून चौकशी करून नियमाप्रमाणे पाईपलाईन टाकण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शेतकऱ्यांना दिलेला मोबदला अतिशय कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे फेर सर्वेक्षण करून योग्य मोबदला दिला जाईल,” असे मंत्री महाजन यांनी सांगितले. या चर्चेत आमदार सुधाकर आडबाले आणि सदस्य भाई जगताप यांनीही सहभाग घेतला. (Tadali Power Station Project)
शेतकऱ्यांच्या अपेक्षा –
शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्यानंतर योग्य मोबदला मिळावा, मंजूर मार्ग न बदलता पाईपलाईन टाकण्यात यावी, अशी मागणी केली होती. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि भविष्यात प्रकल्पांमुळे शेतजमिनींना हानी पोहोचू नये, यासाठी दक्षता घेतली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (Tadali Power Station Project)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
