शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान रोखा; DCM Ajit Pawar यांची पत्राद्वारे केंद्र सरकारकडे मागणी

151
पुण्यात Ajit Pawar यांचा ठाम मुक्काम; भाजपाला रोखण्यासाठी आखली गुप्त पण ठोस रणनिती
पुण्यात Ajit Pawar यांचा ठाम मुक्काम; भाजपाला रोखण्यासाठी आखली गुप्त पण ठोस रणनिती
  • प्रतिनिधी

चीनमधून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बेदाण्यांच्या बेकायदा आणि निकृष्ट दर्जाच्या आयातीमुळे महाराष्ट्रासह देशभरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे तसेच राष्ट्रीय महसुलाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून, ही आयात तातडीने थांबवावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.

काय आहे प्रकरण?

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून या बेकायदा आयातीमुळे देशातील बेदाण्यांचे दर किलोमागे १०० ते १२५ रुपयांनी घसरल्याचे निदर्शनास आणून दिले. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

(हेही वाचा – Yunus Government सत्तेत येताच वर्षभरात हिंदूंवरील अत्याचारात वाढ; काय सांगताहेत आकडे?)

उपमुख्यमंत्री पवारांचे केंद्राला ठाम पत्र –
  • चीनमधून निकृष्ट दर्जाचे बेदाणे आयात होत आहेत.
  • आयात कर आणि शुल्क चुकवले जात असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे.
  • बेकायदा आयात व विक्री थांबवण्यासाठी कठोर कारवाई करावी.
  • बंदरे, विमानतळे आणि बाजारपेठांमध्ये तपास व करवसुली यंत्रणा कार्यक्षम करावी.
  • ऐन हंगामात बेदाण्यांचे दर स्थिर ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.
कोण करणार नुकसान भरपाई?

महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघ पुणे यांनीही याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे होत असलेले आर्थिक नुकसान रोखण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.

(हेही वाचा – Radhika Yadav Murder Case : हरियाणा हादरलं ! राष्ट्रीय टेनिस खेळाडू राधिका यादवला वडिलांनी गोळ्या घालून संपवलं ; कारण काय ?)

शेतकऱ्यांचा सवाल –

“आम्ही मेहनतीने उत्पादित केलेल्या दर्जेदार बेदाण्यांना बाजारात भाव नाही, आणि दुसरीकडे चीनमधून निकृष्ट बेदाणे कर चुकवून भारतात विकले जातात, याला जबाबदार कोण?”

उपमुख्यमंत्री पवारांनी (DCM Ajit Pawar) केंद्र सरकारकडे आयात नियंत्रण, दर्जा तपासणी, करवसुली आणि बाजारातील दर स्थिरता राखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली असून, याबाबतची कार्यवाही आता केंद्राकडून अपेक्षित आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.