नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पाच्या निधीसंदर्भात मंत्री Girish Mahajan यांची महत्त्वपूर्ण माहिती

184
मुसळधार पावसाचा इशारा, घराबाहेर पडण्यापूर्वी 'या' गोष्टींची घ्या काळजी; मंत्री Girish Mahajan यांचे आवाहन
  • प्रतिनिधी 

पश्चिम विदर्भातील दुष्काळग्रस्त भागाला सिंचनाचे जीवनदान देणारा नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्प देशातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक ठरणार असून, या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी विधान परिषदेत दिली.

आमदार अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मंत्री महाजन म्हणाले –

८९ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

सध्याच्या सर्वेक्षणानुसार या प्रकल्पावर अंदाजे ८९ हजार कोटी रुपये खर्च येणार असून, या प्रकल्पामुळे १५ तालुक्यांतील ३ लाख ७२ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

(हेही वाचा – प्रवाशांच्या हितासाठी राज्य सरकारचा निर्णय, नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई; मंत्री Pratap Sarnaik यांची माहिती)

तीन टप्प्यात प्रकल्प पूर्ण होणार

हा प्रकल्प तीन टप्प्यात पूर्ण केला जाणार असून, केंद्र सरकारकडूनही आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.

विदर्भातील अन्य प्रकल्पांनाही गती

मंत्री महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितले की, निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी वर्कआऊट सुरू आहे. जिगाव आणि गोसीखुर्द प्रकल्पांसाठीही निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच वर्धा जिल्ह्यातील बोर आणि धाम प्रकल्पांना लवकरच प्रशासकीय मान्यता दिली जाईल.

(हेही वाचा – मुंबईचा मूळ DNA ‘हिंदुत्व’च: मंत्री Nitesh Rane यांचे विधान, ठाकरे बंधूंवरही साधला निशाणा)

कोकणातील प्रकल्पांनाही चालना

कोकण विभागातील प्रकल्पांनाही गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महामंडळातील रिक्त पदे लवकरच भरती

महामंडळाचा आकृतीबंध अंतिम टप्प्यात असून, तो पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदे भरली जातील, असेही मंत्री महाजन (Girish Mahajan) यांनी स्पष्ट केले. या चर्चेत आमदार परिणय फुके, प्रवीण दरेकर, संजय खोडके तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सहभाग घेतला. राज्यातील पाण्याच्या प्रश्नावर नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्प महत्त्वाचे पाऊल ठरणार असून, विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.