आधीच मुले BMC School सोडून जात आहेत; आता शाळाही बंद करण्याची येत आहे वेळ

838
BMC School : मुलांमधील कलाकृती घडविण्यासाठी पालिका प्रशासनाने लाखो रुपयांचा खर्च करत दिली अशी संधी
BMC School : मुलांमधील कलाकृती घडविण्यासाठी पालिका प्रशासनाने लाखो रुपयांचा खर्च करत दिली अशी संधी
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभाग आणि शाळा (BMC School) पायाभूत सेवा विभागांच्या अनास्थेमुळे महापालिका शाळांमधील मुलांना आता लांबचा प्रवास करत शाळा गाठावी लागणार आहे. यापूर्वी मोरी रोड शाळा अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्यानंतर या शाळेतील मुलांना जवळच्या अन्य शाळांमध्ये हलवण्यात आल्यानंतर आता माहिम पश्चिम येथील एम. एम. छोटानी रोड वरील महानगरपालिका शाळेची इमारत जुन्या धोकादायक बनल्याने जवळपास १५०० विद्यार्थ्यांना वरळीत स्थलांतरित करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. (BMC School)

माहीम येथील मिया मोहम्मद छोटानी रोडवरील मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत (BMC School) जवळपास १५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु ही इमारत आता अतिधोकादायक ठरल्याने या शाळेची इमारत खाली करण्यात येत आहे. त्यामुळे ही इमारत खाली करून पूर्णपणे जमीनदोस्त केली जाणार असून याठिकाणी शालेय इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे या शालेय इमारतीतील मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या सुमारे १५०० मुलांना वरळी येथील ससमिरा येथील महापालिका शाळेत स्थलांतरित करण्यात येणार आहे. माहीम आणि धारावीतील मुलांना वरळीत महापालिकेच्या शाळेत जावे लागणार आहे. दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांनी माहीम ते वरळी हा प्रवास तेथील गरीब विद्यार्थी पालकांना परवडणारा नसून त्रासदायक सुद्धा आहे. यास्तव अनेक विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याची वेळ येऊ शकते. तरी या गरीब माहिमस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळपास परिसरातील शाळांमध्ये स्थलांतरित करावे, जेणेकरून हे विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून देशाचे सुशिक्षित नागरिक बनू शकतात. याबाबत त्यांनी महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. (BMC School)

(हेही वाचा – Kolkata Gang Rape Case : ‘पाय धरून विनवणी केली, पण त्यांनी मला खोलीत ओढले आणि…’; कोलकाता सामूहिक बलात्कार पीडितेची हृदयद्रावक कहाणी आली समोर)

मात्र, महापालिकेच्या माहीम येथील मोरी रोडवरील शाळा (BMC School) ही सर्वप्रथम २०१९ मध्ये सी टू अर्थात अतिधोकादायक घोषित करण्यात आली आणि त्यानंतर सन २०२४ मध्ये पाडण्यात आली. या इमारतीत मराठी, उर्दू आणि इंग्रजी भाषेच्या शाळा चालत होत्या. या शाळांमधील मुलांना आरसी मार्ग आणि न्यू माहीम शाळेत स्थलांतरित करण्यात आले. आता छोटानी मार्गावरील महापालिका आधी जुलै २०२४ मध्ये सी वन अर्थात धोकादायक जाहीर करण्यात आली. आणि डिसेंबर महिन्यात सी टू अर्थात अतिधोकादायक म्हणून जाहीर करून खाली करण्याचे निर्देश दिले. माहीम भागांमध्ये महापालिका शाळांची पटसंख्या चांगल्याप्रकारे असतानाही मोरी रोडची शाळा अतिधोकादायक ठरल्यानंतर पाच वर्षांनी पाडण्यात आली आणि आजही त्याठिकाणी बांधकाम सुरु झालेले नाही. या उलटत मोरी रोडला याच शाळेच्या समोरील जागेत यानंतर खासगी इमारतीचे बांधकाम सुरु होऊन १५ माळ्यांचे बांधकामही झाले आहे. (BMC School)

त्यामुळे वेळीच या शाळांची दुरुस्ती केली असती तर या शाळा अतिधोकादायक झाल्या नसत्या. पण महापालिका शालेय इमारतींची दुरुस्ती आणि पुनर्विकास करणाऱ्या शाळा (BMC School) पायाभूत सेवा विभागाच्या माध्यमातून शालेय इमारतींच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आधीच महापालिका शाळांमधील शिक्षण पद्धतीमुळे मुलांची पटसंख्या घटत आहे, आणि दुसरीकडे जी मुले शाळेत येत आहे, ती मुलेही अशाप्रकारे अतिधोकादायक शालेय इमारती झाल्याने त्यांना अन्य ठिकाणी तसेच घरापासून लांब शाळेत जावे लागत असल्याने शाळा सोडून जात आहे. विशेष म्हणजे माहीममधील पॅरैडाईज सिनेमाच्या मागील बाजूला एका पुनर्विकसित इमारतींच्या जागेत शालेय इमारत बांधून तयार असून केवळ या विकासकाने उद्यानाचा ताबा महापालिकेला न दिल्याने या शालेय इमारतीचा ताबा घेता येत नाही. त्यामुळे माहीम कापड बाजार समोरील नव्याने बांधून झालेली शालेय इमारत ताब्यात घेण्यासाठी विकासकावर उद्यानाचा विकास करून हस्तांतरीत करण्याची सक्ती केल्यास या शालेय इमारतीचा लाभ वरळीला जाणाऱ्या मुलांना होऊ शकतो आणि वरळीमध्ये जाण्याची वेळ मुलांवर येणार नाही, असेही येथील काही पालकांचे म्हणणे आहे. (BMC School)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.